माता जिजाऊ प्रतिष्ठाण आणि नगररोड कट्टयाच्यावतीने कोकणातील ६०० पुरग्रस्त कुटुंबाना मदत

विश्रांतवाडी : कोकणातील चिपळूण आणि खेड मधील पुरग्रस्त वाड्यांतील ६०० कुटुंबांना ब्लॅंकेट, भाडी आणि गरजू वस्तुंचे वाटप माता जिजाऊ प्रतिष्ठान आणि नगररोड कट्ट्याच्या वतीने मदत करण्यात आली. तसेच, चिपळूणच्या पोसरे गावामध्ये दरड कोसळल्यामुळे १७ जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांच्या कुटुंबांना माता जिजाऊ प्रतिष्ठान आणि नगररोड कटटयाच्या वतीने आर्थिक मदतीचा धनादेश वाटप करण्यात आला.
कोकणामध्ये मुसळधार पाऊस झाल्याने. पुरपरिस्थिती निर्माण झाली होती. पावसामुळे चिपळूण आणि खेड मधील अनेक वाडयावस्त्यांवर दरड कोसळण्याची घटना घडली होती. दरडीमुळे पोसरे गावातील दोन कुटुंबातील १७ जणांचा मृत्यू झाला.
शेतीचे नुकसान झाले. खेड मधील धामणंद मधील अनेकांची घरांची दरडीमुळे नुकसान झाले होते. नागरीकांची शेती आणि विहिरीचे दरडीमुळे नुकसान झाले होते. सामाजिक बांधिलकी जपत नगररोड कट्टाच्या वतीने चिपळूण मधील पूरग्रस्त वाड्या वस्त्यावर जाऊन मदत केली. यावेळी माजी आमदार बापुसाहेब पठारे,नगरसेवक अनिल टिंगरे, नगर रोड कटयाचे निंमत्रक नितीन भुजबळ, रमेश आढाव, राजेन्द्र खांदवे, आशिष माने, रियाझ नदाफ आदी मान्यवर उपस्थित होते.





