कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस; 60 बंधारे पाण्याखाली

Updated On:

10 हुन अधिक मार्ग बंद
कोल्हापूर – 
गेल्या 24 तासांहून अधिक वेळ कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून जिल्ह्यातील 60 बंधारे पाण्याखाली गेले आहेत तर राधानगरी धरण 60 टक्के भरलं आहे. पन्हाळा, शाहूवाडी, गगनबावडा, चंदगड मध्ये अतिवृष्टी सुरू असून अनेक नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. त्यामुळे या तालुक्यांमध्ये जनजीवन ठप्प झाले आहे. गगनबावडा तालुक्यात गेल्या 24 तासात सर्वाधिक 122 मिलीमीटर पाऊसाची नोंद झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

आज दुपारी 12 पर्यंत पंचगंगा नदीची पाणीपातळी 35 फुटांवर पोहोचली आहे. त्यामुळे नदीकाठच्या परिसरातील सर्वच मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. पावसामुळे कोल्हापूर शहरातील कसबा बावडा, मंगळवार पेठ, शिवाजी पेठ, राजारामपुरी चौक, शाहूपुरी या ठिकाणच्या सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर इशारा पातळी गाठू शकेल अशी परिस्थिती आहे. जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून गेल्या 24 तासांत जिल्ह्यात 594.35 मिमी पावसाची नोंद जिल्ह्यातील 12 मार्ग बंद ; पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे. जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

आणखी संबंधित बातम्या

Solapur : सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता भयावह; पाण्याच्या थेंबासाठी ग्रामस्थांची कसरत

2026-11-22 22:23:29

Solapur : सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता भयावह; पाण्याच्या थेंबासाठी ग्रामस्थांची कसरत

Narhari Zirwal : "आदिवासी तरुणांनी उच्च शिक्षण घ्यावे" - मंत्री नरहरी झिरवाळ

2026-11-22 17:31:30

Narhari Zirwal : "आदिवासी तरुणांनी उच्च शिक्षण घ्यावे" - मंत्री नरहरी झिरवाळ

Devendra Fadnavis : 'कौशल्ये, ज्ञानाशिवाय पदवी केवळ कागदाचा तुकडा'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

2026-11-22 15:51:13

Devendra Fadnavis : 'कौशल्ये, ज्ञानाशिवाय पदवी केवळ कागदाचा तुकडा'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

Education News : देशातील 32 बनावट विद्यापीठांची UGC कडून यादी जाहीर; महाराष्ट्रातील 'या' दोन संस्थांचाही समावेश

2026-11-21 16:22:05

Education News : देशातील 32 बनावट विद्यापीठांची UGC कडून यादी जाहीर; महाराष्ट्रातील 'या' दोन संस्थांचाही समावेश

Maharashtra Weather Update : राज्यात थंडीचा जोर वाढणार की पावसाची हजेरी? पाहा हवामान विभागाचा ताजा अंदाज

2026-11-21 15:38:21

Maharashtra Weather Update : राज्यात थंडीचा जोर वाढणार की पावसाची हजेरी? पाहा हवामान विभागाचा ताजा अंदाज