Pune Fire News : पुणे-बंगळूरू महामार्गावर टॅंकरला भीषण आग

पुणे : पुणे बंगळूरू महामार्गावरून साताऱ्याकडे जाणाऱ्या टॅंकरला आग लागल्याची घटना घडली. सतर्क नागरिकाने याबाबत अग्निशामक दलाला कळविले. त्या नागरिकाने केमिकल असल्याची शक्यता दर्शविल्याने अग्निशामक दलाच्या ३ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग अवघ्या ५ ते १० मिनिटात आग आटोक्यात आली. मात्र, त्यामध्ये केमिकल नसून, शिरवळ येथे एका कंपनीसाठी जाणारे अॉईल असल्याचे निष्पन्न झाले.
बुधवारी (दि. २४) दुपारी १२.५० च्या सुमारस याबाबत अश्निशामक दलाला कॉल आला. सिंहरोड रोड अश्निशामक दलाचे केंद्रप्रमुख प्रभाकर उमराटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईहून शिरवळ येथील एका कंपनीसाठी हे अॉईल नेण्यात येत होते. जांभुळवाडी येथील दरी पूल ओलांडल्यानंतर टॅंकरला आग लागली.
ओव्हर हिटींग अथवा वायरिंग शॉर्ट झाल्यामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. केमिकल असल्याचा संशय अग्निशामक दलाला फोन केलेल्या सतर्क नागरिकाने व्यक्त केला होता. त्यामुळे सिंहगड रोड, नवले ब्रिज आणि पीएमआरडीएची प्रत्येकी १ गाडी घटनास्थळी पोहोचली. मात्र, तिथे गेल्यावर गाडीत आईल असल्याचे समजले. तिन्हीत गाडीत असलेल्या १० ते १२ जवानांनी आग त्वरित आटोक्यात आणली.





