Video: पहा पाकिस्तानच्या क्वेटा रेल्वे स्थानकावर कसा झाला बॉम्बस्फोट, 24 लोकांचा मृत्यू

बलुचिस्तान : पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये भीषण बॉम्बस्फोट झाला आहे. या घटनेत 24 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 15 जवानांचाही समावेश आहे. तर 46 हून अधिक जण जखमी झाले आहेत. बलुचिस्तानमधील क्वेट्टा येथील रेल्वे स्थानकाजवळ हा बॉम्बस्फोट झाला. रेल्वे स्टेशनच्या बुकिंग ऑफिसमध्ये ट्रेन प्लॅटफॉर्मवर येण्यापूर्वीच हा स्फोट झाल्याचं प्राथमिक वृत्त आहे.
स्फोटाची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव कर्मचारी स्फोटाच्या ठिकाणी पोहोचले. जखमींवर क्वेटा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जाफर एक्स्प्रेस सकाळी 9 वाजता पेशावरसाठी रवाना होणार होती. स्फोट झाला तेव्हा ट्रेन प्लॅटफॉर्मवर पोहोचली नव्हती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने स्फोटातील मृतांचा आकडा वाढू शकतो.
At least 20 people were killed and 53 others injured on Saturday morning in a blast at a railway station in Pakistan. https://t.co/GFWfoLbJGg #QuettaRailwayStation #QuettaBalst #quettablast #Quetta #Pakistan #blast #railwaystation pic.twitter.com/03NJBGtFil
— Shanghai Daily (@shanghaidaily) November 9, 2024
कार्यवाहक राष्ट्रपती सय्यद युसूफ रझा गिलानी यांनी या प्राणघातक घटनेचा निषेध करत म्हटले की, दहशतवादी हे मानवतेचे शत्रू आहेत जे निष्पाप लोकांना लक्ष्य करतात. दहशतवादाचा समूळ नायनाट करण्यासाठी शक्य ते सर्व पाऊल उचलण्याच्या आपल्या संकल्पाचा गिलानी यांनी पुनरुच्चार केला. दरम्यान, बलुचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज बुगती यांनी संबंधित अधिकाऱ्यांना या जीवघेण्या घटनेची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी प्रांतातून दहशतवादाचा समूळ उच्चाटन करण्याच्या आपल्या संकल्पाचा पुनरुच्चार केला.





