Pune News : मसापमधील वादाचा शंभराव्या साहित्य संमेलनावर परिणाम नाही : राजेश पांडे
Pune News : महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये (मसाप) सुरू असलेल्या अंतर्गत वादाचा शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनावर कोणताही परिणाम होणार नाही, असे स्पष्टीकरण संमेलनाचे निमंत्रक राजेश पांडे यांनी शनिवारी दिले आहे.

Pune News : महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत वादाचा शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनावर कोणताही परिणाम होणार नाही. काही दिवसांपूर्वी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत संमेलनाचे नियोजन करण्यात आले. (Pune News)
संमेलनाचे नियोजन आणि निमंत्रकाची जबाबदारी समर्थ युवा फाउंडेशनकडे सोपविण्यात आली आहे. त्यानुसार फाउंडेशनने कामालाही सुरुवात केली आहे, अशी भूमिका संमेलनाचे निमंत्रक राजेश पांडे यांनी शनिवारी मांडली. (Pune News)
राष्ट्रीय पुस्तक न्यास(एनबीटी) आणि समर्थ युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाच्या मंडप उभारणीच्या कामाचा शुभारंभ शनिवारी झाला. या वेळी पांडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महाराष्ट्र साहित्य परिषदेतील वाद आणि त्याचा साहित्य संमेलनाच्या आयोजनावर होणाऱ्या संभाव्य परिणामांबाबत भूमिका मांडली. (Pune News)
पांडे म्हणाले, ‘अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वतीने साहित्य संमेलन आयोजित केले जाते. महाराष्ट्र साहित्य परिषद ही महामंडळाची घटक संस्था आहे. मात्र, परिषदेतील अंतर्गत वादाचा संमेलनाच्या नियोजनावर कोणताही परिणाम होणार नाही. (Pune News)
महामंडळाच्या बैठकीत संमेलनाचे नियोजन करण्यात आले असून, त्याची जबाबदारी समर्थ युवा फाउंडेशनकडे देण्यात आली आहे. फाउंडेशनने आयोजनाच्या दृष्टीने काम सुरू केले आहे,’ असे पांडे यांनी सांगितले. (Pune News)
‘मी साहित्य चळवळीतील कार्यकर्ता असल्याने साहित्य परिषदेतील अंतर्गत वादावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही. परिषदेच्या विश्वस्त मंडळातील सदस्यांमधील वादाचे निराकरण धर्मादाय आयुक्त करतील. (Pune News)
पुण्याला शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा मान मिळाला असून, हे संमेलन ऐतिहासिक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होत आहे. संमेलनाच्या तोंडावर अशा प्रकारचे वाद होणे योग्य नाही. (Pune News)
सर्वांनी एकत्र येऊन समोपचाराने हे वाद मिटवावेत,’ अशी अपेक्षा पांडे यांनी व्यक्त केली. साहित्य आणि संस्कृतीच्या क्षेत्रात राजकारण येऊ नये. पक्षीय किंवा सत्तेचे राजकारण साहित्य क्षेत्रात होऊ नये, असेही पांडे यांनी सांगितले. (Pune News)
शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राज्य सरकारने पाच कोटी रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. मात्र, राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, संमेलन अधिकाधिक लोकसहभागातून आयोजित करण्यावर आमचा भर राहील. साध्या पद्धतीने मात्र, साहित्यिकदृष्ट्या दर्जेदार संमेलन आयोजित करून मराठी भाषा आणि साहित्याच्या संवर्धनासाठी भरीव योगदान देण्याचा आमचा प्रयत्न आहे. राज्य सरकारने जाहीर केलेला अनुदानाचा निधी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी वापरण्याबाबतही आमचा मनोदय आहे. साहित्य महामंडळाशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल’
– राजेश पांडे, निमंत्रक, शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन





