‘अल्लाहच्या कृपेने, आमच्याकडे अणुबॉम्ब आहे”…; नवाज शरीफ यांच्या मुलीची भारताला धमकी

Maryam Nawaz on Pahalgam Attack । पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये अजूनही तणाव आहे. भारताने पाकिस्तानविरुद्ध अनेक कठोर पावले उचलली आहेत. याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने अनेक वेळा अणुबॉम्बची धमकी दिली आहे. आता पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांनीही अणुबॉम्बबाबत विधान केले आहे. मरियम यांनी,” पाकिस्तानवर कोणीही हल्ला करू शकत नाही” असा दावा केला आहे.
एका वृत्तसंस्थेनुसार, मरियम नवाज यांनी, “आज भारत-पाकिस्तान सीमेवर तणाव आहे. धोका निर्माण झाला आहे, पण काळजी करण्याची गरज नाही. अल्लाहने पाकिस्तानी सैन्याला इतकी शक्ती दिली आहे की ती शत्रूच्या प्रत्येक हल्ल्याचा प्रतिकार करू शकते. मी तुम्हाला सांगते आज पाकिस्तानचा कोणताही शत्रू हल्ला करण्यापूर्वी दहा वेळा विचार करेल. याचे कारण असे आहे की, अल्लाहच्या कृपेने, पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे.”
नवाज शरीफ यांचे मरियमकडून कौतुक
मरियम नवाज यांनी त्यांचे वडील आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे कौतुक केले. त्यासाठी त्यांनी,”पाकिस्तानला अणुशक्ती बनवण्यात नवाज शरीफ यांनी ऐतिहासिक भूमिका बजावली आहे.
भारत आणि पाकिस्तानमध्ये तीव्र तणाव Maryam Nawaz on Pahalgam Attack ।
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई केली आणि सिंधू पाणी करार स्थगित केला. यासोबतच आणखी काही निर्णय घेण्यात आले. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानने भारतासाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले. आता पाकिस्तान भारताला अणुबॉम्बची धमकी देत आहे. तथापि, दरम्यानच्या काळात ते तुर्की आणि रशियासारख्या अनेक देशांमध्ये पोहोचले आहे. पाकिस्तानने रशियाला भारताला पटवून देण्याचे आवाहन केले होते.
हेही वाचा
लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य दिल्यानंतर पंतप्रधान आज मोठा निर्णय घेणार? ; सीसीएसची आज महत्वपूर्ण बैठक





