पुणे जिल्हा | हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाचा कधीही खरेदी-विक्री संघ होईल

राजगुरूनगर, (प्रतिनिधी) – येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालय लोकांच्या देणगीवर उभे राहिले आहे. हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाचा कधी खरेदी-विक्री संघ होईल हे आता सांगता येत नाही. खरेदी-विक्री संघावर आता प्रशासक आणला आहे.
आता या कॉलेजची भीती वाटायला लागली आहे, असे वक्तव्य आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केले.
आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा जनसंवाद दौरा मंगळवारी (दि. 8) तालुक्यातील चास, आखारवाडी, मिरजेवाडी, बहिरवाडी, बुट्टेवाडी, काळेचीवाडी, पांगरी, पाडळी, पापळवाडी आणि सातकरस्थळ येथे झाला.
यावेळी पांगरी येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या मंगल चांभारे, खेड बाजार समितीचे अध्यक्ष कैलास लिंभोरे, माजी सभापती विलास कातोरे, संचालक हनुमंत कड, पप्पू टोपे, युवक तालुका अध्यक्ष जयसिंग दरेकर,
पंचायत समितीचे माजी सभापती अरुण चौधरी, माजी उपसभापती वैशाली जाधव, अॅड. मनीषा टाकळकर, नंदा कड, वैभव घुमटकर, वैभव नाईकरे, सुजाता पचपिंड, अॅड. रामदास घोलप, अॅड. अरुण मुळूक, रवींद्र भोसले, अॅड. संतोष तळेकर, प्रकाश घोलप, अमोल गाढवे, दत्तात्रय खांडगे,
गणेश शितोळे, संतोष काळे, अॅड. प्रकाश तळेकर, प्रफुल्ल बुट्टे, वासुदेव घोलप, शत्रुघ्न खांडगे, महेंद्र गाढवे, बाळासाहेब बुट्टे, वसंत तळेकर, बबनराव घोलप सोपं घोलप, गणपत घोलप सुदाम खांडगे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार मोहिते म्हणाले, कॉलेजच्या कारभाराबाबत लोकांनी परिपत्रके काढली आहेत.चुकीच्या बातम्या सोशल मीडियावर येत आहेत.
संस्थेमध्ये चुकीच्या पद्धती आणि भ्रष्टाचार चालला आहे, स्वर्गीय साहेबराव पाटीलांनी ज्या गोष्टीसाठी त्याग केला.
ज्या पद्धतीने ते वागले त्या सर्वाला तिलांजली देण्याचे काम तेथे होत आहे. स्व. साहेबराव बुट्टे पाटील यांना वरती काय वाटत असेल हे सांगता येत नाही.
चुकीची माणसे बसली आहेत. त्यामुळे या संस्थेचे वाटोळे होण्यास वेळ लागणार नाही. तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्याची आता वेळ आली आहे. लोकांच्या करता काम करणारे सरकार आहे.
अजित पवार मुख्यमंत्री होण्यासाठी दिलीप मोहिते याना निवडून दिले पाहिजे. माझ्या मागे ग्रामस्थांनी ठामपणे उभे राहावे.
तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी पुन्हा संधी द्यावी आमचा प्रवास तुमच्यासोबत आहे. असे त्यांनी नमूद केले. सूत्रसंचालन प्रकाश घोलप यांनी तर अमोल गाढवे यांनी आभार मानले.
विद्वान सुपुत्र आल्यानंतर…
या संस्थेचे वाटोळे व्हावे असे मला कधीच वाटले नाही. मी तेथे संचालक होतो मात्र साहेबराव बुट्टे पाटील यांचे विद्वान सुपुत्र आल्यानंतर मी बाहेर पडलो. कारण त्यांनी काही कष्टचं केले नाहीत.कॉलेजसाठी कधी देणगी मागण्याचा प्रयत्न केले नाहीत.
त्यांना असे वाटत आहे की आपणच मालक आहोत.ते मालक असल्यासारखे कॉलेज चालवत आहेत म्हणून आता भीती वाटू लागली आहे. तेथे गोर गरिबांची मुले शिकत आहेत त्यांचे भवित्यव्य काय? म्हणून आता आपण हळूहळू चांगले निर्णय घेत आहोत, असे आमदार मोहिते पाटील बोलत होते.
तालुक्यात तिसरा महामार्ग होणार
पांगरी हम रस्त्यावरील गाव आहे. या रस्त्याचे राष्ट्रीय महामार्गात लवकरच रूपांतर होणार आहे. राजगुरूनगर-डेहणे-मंदोशी-भीमाशंकर असा हा मार्ग असणार आहे.
दुसरा राष्ट्रीय महामार्ग रस्ता शिरगाव-मोरोशी-धामणगाव-घोटवडी-कुडे-आंबोली-कर्जत या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाची मंजुरी मिळाली आहे.
तालुक्यातील तिसरा राष्ष्ट्रीय महामार्ग शिरूर-शिरोली-आंबोली-कर्जत असा रस्ता होणार आहे, असे आमदार मोहितेंनी नमूद केले.
आमदार दिलीप मोहिते पाटील हे त्यांच्या कामातून विरोधकांना उत्तर देणारे आमदार आहेत. विरोधकांनी अन् एकदा त्याच्या वाटेत काटे पेरले मात्र त्याची फुले करून ते पुढे गेले.
पांगरी गावासह तालुक्याचा सर्वांगीण विकास केला. पांगरी गावातून जास्तीत जास्त मते मिळतील. – अॅड. रामदास घोलप,





