मंगलकार्यालये तारखा बदलून देणार
Updated On:

पुणे – मंगलकार्यालये आणि हॉलचे ऍडव्हान्स बुकिंग केले असेल तर त्याच्या तारखा बदलून देण्याचा निर्णय लॉन्स, मंगलकार्यालयांचे मालक आणि चालक यांच्या बैठकीत घेण्यात आला.
याविषयी किशोर सरपोतदार, अरुणा ढोबळे आणि सुरेश शर्मा यांनी सांगितले की, करोनाचा फटका या व्यवसायालाही बसला आहे. बुकिंगनुसारच मंगलकार्यालये आणि हॉल चालक, मालक हे कामगार आणि अन्य गोष्टींचे नियोजन करतात. करोनामुळे लॉकडाऊन झाले आणि कोणतेच कार्यक्रम घेता येऊ शकलेले नाहीत. अनेकांना लग्न, मुंजी पुढे घ्याव्या लागल्या आहेत, अशा तारखा आता बदलून देणार आहोत.





