मार्केटयार्ड भुसार बाजार दुपारी चारपर्यंत सुरू
Updated On:

पुणे -मार्केटयार्डमधील गूळ आणि भुसार बाजाराच्या कामकाजाच्या वेळेत बदल करण्यात आला असून सुधारित वेळेनुसार पुढील काही दिवस सकाळी 8 ते दुपारी 4 यावेळेत कामकाज सुरू राहणार आहे.
घाऊक भुसार बाजाराताली खरेदी- विक्री (लोडिंग आणि अनलोडिंग) व्यवहार वरील वेळेत होणार आहेत. त्यानंतर बाजार आवरातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहे. दुकानातील कामगार तसेच ग्राहकांच्या संख्येबाबत पुणे महापालिकेने सूचना दिल्या आहेत. करोनाच्या संसर्गामुळे प्रत्येकाने नियमावलीचे पालन करणे गरजेचे आहे, असे आवाहन बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी केले आहे. दुकानातील व्यापारी, कामगारांनी लसीकरण त्वरीत करून घ्यावे. त्याचे प्रमाणपत्र जवळ बाळगणे गरजेचे आहे





