मार्क झुकेरबर्गने घरात पत्नीचा मोठा पुतळा का बसवला? ; शतकानुशतके जुन्या इतिहासाशी आहे कनेक्शन, वाचा

Mark Zuckerberg । फेसबुक, इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा मालक आणि मेटाचा सीईओ मार्क झुकेरबर्ग सध्या त्याच्या कामापेक्षा वेगळ्याच विषयावरून चर्चेत आला आहे. त्याने आपल्या घराच्या मागच्या अंगणात एक खास पुतळा बसवला आहे, ज्याबद्दल लोक सतत बोलत आहेत. त्यांनी पत्नी प्रिसिला चॅनचा हा भव्य पुतळा बसवण्यात आला आहे. खुद्द मार्क झुकरबर्गने आपल्या पत्नीच्या पुतळ्याचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तेव्हापासून हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून लोक मेटाच्या सीईओला ‘हजबंड ऑफ द इयर’ म्हणत आहेत.
पत्नीचा पुतळा का बसवला? Mark Zuckerberg ।
सोशल मीडियावर हे छायाचित्र पाहिल्यानंतर लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहे की, मार्क झुकरबर्गने आपल्या पत्नीचा पुतळा का बसवला? खुद्द मार्कनेच याचे उत्तर दिले आहे. फोटो शेअर करण्यासोबतच मार्कने सांगितले की, “तो जुन्या रोमन परंपरेचे पालन करत आहे, जेव्हा लोक त्यांच्या पत्नीचा पुतळा बसवायचे.” प्रिसिला चॅनचा हा पुतळा अमेरिकेतील प्रसिद्ध शिल्पकार डॅनियल अर्शम यांनी तयार केला आहे. प्रिसिला चॅनचा हा पुतळा 7 फूट उंच आहे.
View this post on Instagram
सोशल मीडियावर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया Mark Zuckerberg ।
मार्क झुकरबर्गच्या या फोटोवर लोक वेगवेगळ्या पद्धतीने प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी मार्कच्या या निर्णयाचे कौतुक केले आणि लिहिले की, त्याच्या पत्नीला खूश करण्यासाठी हे खरोखर एक चांगले पाऊल आहे. एका यूजरने गंमतीत म्हटले की, आज जगातील प्रत्येक पती हादरत आहे. पुतळ्याचे कौतुक करताना एका यूजरने लिहिले की, तुमची पत्नी हुबेहूब देवीसारखी दिसते. या निर्णयावर टीका करताना एका यूजरने लिहिले की, हा पुतळा बनवण्यासाठी खर्च झालेल्या पैशातून किती बेघर लोकांना मदत करता आली असती.
मार्क झुकरबर्ग आणि त्यांची पत्नी प्रिसिला चॅन यांच्या लग्नाला 12 वर्षांहून अधिक काळ झाला आहे. दोघांनाही तीन मुली आहेत. दोघेही 2003 मध्ये कॉलेजमध्ये भेटले होते आणि अनेक वर्षे डेटिंग केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. हे बिझनेस वर्ल्डमधील पॉवर कपल्सपैकी एक आहे.





