Rain news – गणेशोत्सवात झेंडूला शंभर रुपये किलो दर मिळाल्यानंतर शेतक-यांचे चेहरे फुलले होते. परंतु मुसळधार पाऊस आणि पुराच्या तडाख्यात फुलशेती वाहून गेली आहे. यात झेंडूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नवरात्राच्या तोंडावरच झेंडूचे नुकसान झाल्याने फुलांची प्रत खराब झाली असून, भावातही मोठी घसरण झाली आहे. एक तर झेंडूच्या फूल उत्पादनात मोठी घट आणि त्यात भावात घसरण झाल्याने फूल उत्पादक शेतक-यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, शेतकरी अभूतपूर्व संकटात सापडला आहे. शेतक-यांच्या मते, पावसामुळे झेंडूच्या फुलांची गुणवत्ता खालावली आहे. पावसामुळे झेंडूचे भाव घसरले असून, व्यापारी चांगल्या प्रतीचे झेंडू फक्त ४० ते ५० रुपये किलो दराने खरेदी करत आहेत. सणासुदीच्या हंगामात अपेक्षित असलेला दर न मिळाल्यामुळे शेतक-यांना उत्पादन खर्च मिळणेही कठीण झाले असून, यामुळे झेंडू उत्पादक शेतक-यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे फूल उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. गणेशोत्सवात शंभर रुपये किलो दर होता. पण आता भाव अर्ध्यावर आला. शेतक-यांच्या म्हणण्यानुसार पावसामुळे झेंडूची गुणवत्ता कमी झाल्यामुळे व्यापारी भाव कमी करीत आहेत. तसेच सणासुदीला चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा होती. पण पावसामुळे फुलांची गुणवत्ता कमी झाली. त्यामुळे व्यापारी भाव पाडत आहेत. यामुळे यामुळे खर्च भागवणे अवघड झाले आहे, असे उत्पादकांनी म्हटले. सणासुदीतील आर्थिक चिंता : नवरात्र व दीपावली हे फुलांचे प्रमुख हंगामी सण असले तरी भाव घटल्यामुळे शेतक-यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. झेंडू हे सणासुदीच्या हंगामातील महत्त्वाचे उत्पादन आहे आणि त्यावर अवलंबून असलेल्या शेतक-यांचे उत्पन्न या घटलेल्या भावांमुळे मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले आहे. शेतक-यांच्या म्हणण्यानुसार जर या सणासुदीत अपेक्षित प्रमाणात भाव मिळाला नाही तर झेंडूच्या उत्पादनाचा खर्च भागवणेही कठीण होईल. यामुळे त्यांच्या कुटुंबीयांचा दररोजचा खर्च आणि भविष्यातील उत्पादनाची योजना यावरही परिणाम होईल.