नवी दिल्ली – उपराष्ट्रपती निवडणुकीतील विरोधी पक्षांच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांना आणखी दोन पक्षांनी पाठिंबा जाहीर केला आहे. त्या पक्षांमध्ये आम आदमी पक्ष (आप) आणि झारखंड मुक्ती मोर्चाचा (झामुमो) समावेश आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अध्यक्षतेखाली आपच्या राजकीय व्यवहार समितीची बैठक झाली. त्यामध्ये अल्वा यांना पाठिंबा देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. त्यामुळे आपचे राज्यसभेतील सर्व 10 सदस्य अल्वा यांच्या बाजूने मतदान करतील.
झारखंडमधील सत्तारूढ आघाडीचे नेतृत्व करणाऱ्या झामुमोनेही विरोधकांच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला. त्या पक्षाने राष्ट्रपती निवडणुकीत वेगळी भूमिका घेताना केंद्रातील सत्तारूढ एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. झामुमोचे राज्यसभा आणि लोकसभेत मिळून 3 खासदार आहेत.
Cabinet meeting : शिंदे गटाच्या आमदारांची सुरक्षा वाढवणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक 6 ऑगस्टला होणार आहे. त्या निवडणुकीसाठी एनडीएने जगदीप धनखड यांना उमेदवारी दिली आहे. उपराष्ट्रपती निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार केवळ राज्यसभा आणि लोकसभा या संसदेच्या दोन्ही सभागृहांतील सदस्यांना म्हणजे खासदारांना आहे.
योगी सरकारला आपल्याच आश्वासनाचा विसर; आक्रमक शेतकरी “हे” पाऊल उचलण्याच्या तयारीत