मराठवाड्यात पावसाची मोठी तूट; अपेक्षेच्या तुलनेत केवळ २९.४ टक्के पावसाची नोंद
Marathwada Rainfall : सप्टेंबर महिन्याचा मध्य उलटला तरी मराठवाड्यात पावसाने पाठ फिरवल्याने विभागातील बळीराजा चिंतातुर झाला आहे.

सप्टेंबर महिन्याचे अर्धे दिवस संपले असून, मराठवाडा विभागात मॉन्सूनच्या या शेवटच्या महिन्यात अपेक्षेच्या तुलनेत केवळ २९.४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. यामुळे विभागातील एकूण पावसाची तूट आणखी वाढली आहे.
राज्य महसूल विभागाच्या सोमवारी जाहीर झालेल्या अहवालानुसार, सप्टेंबर महिन्यात मराठवाड्यात ७७.५ मिमी अपेक्षित पावसाच्या तुलनेत १४ सप्टेंबरपर्यंत केवळ २२.८ मिमी (२९.४ टक्के) पावसाची नोंद झाली आहे.
मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, धाराशिव, लातूर, नांदेड आणि हिंगोली या आठ जिल्ह्यांचा समावेश होतो. १ जूनपासूनच्या एकूण आकडेवारीनुसार, या मॉन्सून हंगामात (मध्यापर्यंत) मराठवाड्यात ६७९.५ मिमी अपेक्षित पावसाच्या तुलनेत केवळ ४०५.६ मिमी (५९.७ टक्के) पाऊस पडला आहे. (Marathwada Rainfall)
Mumbai Rain : मुंबईत पावसाची हजेरी.! हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा




