मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला कोठारेने आपल्या डान्स, अभिनय आणि सौंदर्याने चाहत्यांवर भुरळ घातली आहे. उर्मिला कोठारे ही मराठी इंडस्ट्रीमधील सर्वात फिट अभिनेत्रींपैकी एक आहे.
View this post on Instagram
अशातच तिने तिचे काही ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. उर्मिलाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती नेहमीप्रमाणेच खूप सुंदर दिसत आहे. यामध्ये तिने गुलाबी रंगाचा एक ड्रेस परिधान केला आहे.
View this post on Instagram
यासोबत तिने हाय हिल्स घातले आहेत. या फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तसेच तिच्या काळ्याभोर कुरळ्या केसांनी तिच्या या सौंदर्यात आणखीनच भर पाडली आहे.
View this post on Instagram
हा फोटो शेअर करून तिने लिहिले की, गुलाबी हा लोकप्रिय रंग का आहे? तिच्या या फोटोवर तिचे चाहते सातत्याने कमेंट करून तिचे कौतुक करताना दिसत आहे. एका चाहत्याने कमेंट केली आहे की, तू गुलाबी रंग घातलाय म्हणून तो लोकप्रिय आहे.
View this post on Instagram