मराठमोळ्या अभिनेत्याला मिळाली मोठी संधी; करण जोहरच्या आगामी सीरिजमध्ये झळकणार

Shashank Ketkar : झी मराठी वाहिनीवरील ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेतून अभिनेता शशांक केतकर घराघरात पोहचला. या मालिकेमुळे त्याला एक वेगळी ओळख मिळाली. मालिकांसह शंशाक चित्रपट, नाटक आणि वेबसिरिजमध्ये झळकला आहे. नुकतेच त्याने ‘स्कॅम 2003 ’ या तेलगी घोटाळ्यावर आधारित सीरिजमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती. यातील त्याच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले होते. यानंतर आता शशांकने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना एक आनंदाची बातमी शेअर केली आहे.
शशांक लवकरच धर्मा प्रोडक्शन अर्थात करण जोहरची निर्मिती असलेल्या आगामी सीरिजमध्ये महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. या सीरिजचं नाव ‘शो टाइम’ असे आहे. ही बहुचर्चित सीरिज येत्या 8 मार्चला प्रदर्शित केली जाणार आहे. याविषयी शशांक सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहितो की, “8 मार्चपासून हॉटस्टारवर ‘शो टाइम’ पाहायला विसरू नका. जेव्हा मी धर्मा प्रोडक्शनच्या ऑफिसमध्ये मीटिंगसाठी गेलो तेव्हाच जाणवलं ‘कुछ कुछ होता है’. माझी भूमिका लहानशी आहे पण, प्रेक्षकांसाठी ही भूमिका नक्कीच लक्षवेधी ठरेल.” सोबतच त्याने एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे.
View this post on Instagram
‘शो टाइम’ सीरिजमध्ये कोण-कोणते कलाकार असणार?
दरम्यान, शशांकच्या ‘शो टाइम’ सीरिजमध्ये नसीरुद्दीन शाह, मौनी रॉय, महिमा मकवाना, राजीव खंडेलवाल, श्रिया सरन, इमरान हाश्मी यांसारखे दिग्गज कलाकार मंडळी एकत्र झळकणार आहेत. बॉलीवूडच्या दमदार कलाकारांसोबत काम करण्याची संधी शंशाकला मिळाली आहे. त्याचे चाहते देखीलत्याला या नव्या सीरिजमध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहे.





