Marathi Television : …अन् हेमांगी कवीने मागितली ‘माफी’

Marathi Cinema : अभिनेत्री हेमांगी कवी तिच्या विनोदीशैलीमुळे खासकरून ओळखली जाते. अनेक मालिका, नाटक आणि चित्रपटांद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसते. याशिवाय ती जाहिरातींमध्ये देखील काम करताना दिसते. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या हेमांगी नेहमीच तिच्या हटके अंदाजामुळे चर्चेत असते.
हेमांगी कवीने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली. या स्टोरीत तिने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये काही माणसांच्या सवयीबद्दल लिहिण्यात आले आहे. काही माणसं हे चॅट्स पाहतात आणि त्यावर उत्तर द्यायलाच विसरतात, असे यात म्हटले आहे.
यावर हेमांगीने तिच्यात ही वाईट सवय असल्याचे सांगितले. मला माफ करा, पण मी देखील यातील काही माणसांपैकी एक आहे, असे हेमांगी कवी म्हणाली. तिचा हा रिप्लाय सध्या चांगलाच चर्चेत आहे.
दरम्यान, हेमांगीने काही दिवसांपूर्वी चाहत्यांसोबत एक गुडन्यूज शेअर केली आहे. लवकरच ती बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे.
एका जाहिरातीच्या निमित्ताने तिला ही संधी मिळाली आहे. त्याबरोबरच ती ‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकेत झळकत आहे. या मालिकेत ती वकिलाची भूमिका साकारत आहे. अॅड. गायत्री वर्तक असे तिच्या मालिकेच्या पात्राचे नाव आहे. या जाहिरातीत तिला बिग बींबरोबर काम करण्याची संधी मिळाली आहे. हेमांगीने या जाहिरातीच्या शूटिंगदरम्यानचे काही खास क्षण हेमांगीने व्हिडिओतून शेअर केले आहेत.






