Marathi Television : म्हातारचाळे म्हणत ट्रोल करणाऱ्या युजर्सला ऐश्वर्या नारकरने दिले सडेतोड उत्तर

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री ‘ऐश्वर्या नारकर’ नेहमीच तिच्या मालिकेतील पात्रामुळे चर्चेत असते. यासोबतच ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ऐश्वर्या आणि अविनाश नारकर हे कायमच सोशल पोस्ट शेअर करत असतात.
त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवर कधी चाहते प्रेमाचा वर्षाव करतांना दिसतात तर कधी या जोडप्याला ट्रोलिंगला सामोरे जावे लागते. नेहमीच रिल्समुळे चर्चेत राहणाऱ्या या कपलंने आता ट्रोलरला सडेतोड उत्तर दिले.
गेल्या काही दिवसांपूर्वी या कपलंने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. त्या व्हिडीओवरून त्यांना नेटकऱ्यांनी प्रचंड ट्रोल केलं होतं. दरम्यान, त्या ट्रोलिंगवर ऐश्वर्याने थेट उत्तर दिले आहे.
नुकतंच ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांनी एक रिल शेअर केल. त्या व्हिडीओला त्यांनी “कपल गोल्स, तुमच्या आयुष्यामध्ये बदल हा एक महत्वाचा भाग आहे. फक्त चांगले बनण्याचा प्रयत्न करा. नेहमीच एकमेकांसोबत बोलण्याचा प्रयत्न करा. मनातली गोष्ट शेअर करा. बोलून मोकळे व्हा.. एकमेकांचे मित्र व्हा.. मित्राल कायमच कोणत्याही परिस्थितीत साथ द्या… तुम्ही पती आहात की पत्नी हे महत्त्वाचे नाही. आयुष्य तुम्हाला नक्कीच सुखाच्या वाटेवर घेऊन जाईल. प्रयत्न करून पाहा.” या व्हिडिओवरन काही युजर्सने त्यांना चांगलेच ट्रोल केले आहे.
एकाने त्यांना म्हातारचळ लागलेले आईबाबा अशी कमेंट केली होती. यावर ऐश्वर्याने सडेतोड ऊत्तर देत लिहिले, “बुद्धी गंजेल असे विचार करून, तुमच्या घराण्यात म्हातारचाळे लागण्याचा रोग आहे वाटतं. जगून घ्या, गेलात तर दुसऱ्यांना बोलण्यात सगळंच राहून जाईल.. म्हातारचाळेचा अर्थही बघून घ्या जरा.. बुद्धी भ्रष्ट,” अशी प्रतिक्रिया दिली आहे. पुढे तिने हसण्याचा इमोजी सुद्धा दिला आहे.





