Aishwarya Narkar: ‘लाल बांगडी’ गाण्यावर ऐश्वर्या नारकरांचा भन्नाट डान्स! अविनाश नारकरांच्या कमेंटने वेधलं लक्ष
Aishwarya Narkar ऐश्वर्या नारकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक खास ट्रांजिशन व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला त्या साध्या कुर्त्यामध्ये दिसतात. त्यानंतर ट्रांजिशन होताच त्या सुंदर लाल बॉर्डरच्या साडीत दिसून येतात.

Aishwarya Narkar: मराठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. अभिनयासोबतच त्या ट्रेंडिंग गाण्यांवर रील्स व्हिडीओ बनवत चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या ‘लाल लाल कलरची बांगडी’ या गाण्यावर त्यांनी केलेला डान्स व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे.
गायक संजू राठोडच्या ‘लाल लाल कलरची बांगडी’ या गाण्याने सध्या सोशल मीडियावर जबरदस्त लोकप्रियता मिळवली आहे. सामान्य नेटकऱ्यांपासून अनेक सेलिब्रिटींपर्यंत सगळेजण या गाण्यावर रील्स बनवत आहेत. आता या ट्रेंडमध्ये अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनीही सहभाग घेतला आहे. Aishwarya Narkar
ऐश्वर्या नारकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक खास ट्रांजिशन व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला त्या साध्या कुर्त्यामध्ये दिसतात. त्यानंतर ट्रांजिशन होताच त्या सुंदर लाल बॉर्डरच्या साडीत दिसून येतात. कानात झुमके, कपाळावर मोठी टिकली आणि हातात लाल बांगड्या अशा पारंपरिक लूकमध्ये त्यांचा अंदाज चाहत्यांना खूप आवडला आहे. (Aishwarya Narkar)
‘आज मूड फक्त लाल बांगड्यांचा’ असे भन्नाट कॅप्शन देत त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये त्यांनी ‘लाल लाल कलरची बांगडी’ या गाण्यावर दिलखेचक अदा आणि जबरदस्त डान्स केला आहे. त्यांच्या या स्टाईलवर चाहत्यांनी कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडला आहे.
View this post on Instagram
या व्हिडीओवर ऐश्वर्या यांच्या पती आणि अभिनेते अविनाश नारकर यांनीही खास प्रतिक्रिया दिली आहे. “व्वा व्वा व्वा… कमाल!” अशी कमेंट करत त्यांनी पत्नीच्या डान्सचे कौतुक केले आहे. विशेष म्हणजे, या गाण्याचा गायक संजू राठोड यानेही ऐश्वर्याच्या व्हिडीओवर “सुंदर…” अशी कमेंट केली. त्याने हा व्हिडीओ स्वतःच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरही शेअर केला आहे.
‘लाल लाल कलरची बांगडी’ हे गाणे सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहे. “बांगडीचा कलर लाल, चाल माझ्या सोबत चाल…” असे या गाण्याचे बोल प्रेक्षकांच्या ओठावर रेंगाळताना दिसत आहेत. हे गाणे संजू राठोडने स्वतः लिहिले असून त्यानेच ते संगीतबद्धही केले आहे. या गाण्याला जी-स्पार्कने संगीत दिले आहे. Aishwarya Narkar
या गाण्याच्या व्हिडीओमध्ये संजू राठोड आणि ईशा मालवीय यांची जोडी पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांकडून या जोडीला चांगली पसंती मिळत असून गाणे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. (Aishwarya Narkar)
दरम्यान, ऐश्वर्या नारकर यांच्या या डान्स व्हिडीओने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, त्या केवळ दमदार अभिनेत्रीच नाहीत तर ट्रेंडिंग गाण्यांवर भन्नाट परफॉर्मन्स देण्यातही त्या तितक्याच पुढे आहेत.





