मराठी चित्रपटांना सुद्धा ओटीटी प्लॅटफॉर्मवर हवा

मुंबई – ‘कोरोना विषाणू’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे जवळपास साडेतीन महिन्यांपासून चित्रपटगृह बंद आहेत. त्यामुळे चित्रपटसृष्टीला सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लॉकडाऊनमुळे अनेक कलाकार आपल्या घरात बसून आहेत.
दरम्यान, इतक्यात तरी चित्रपटगृह उघडण्याची शक्यता नसल्याने अनेक मोठे चित्रपट निर्माते चित्रपट डिजिटल प्रदर्शित करण्याचा मार्ग निवडत आहेत. अश्यातच आता, यामध्ये मराठी चित्रपटांचा सुद्धा समावेश ओटीटी प्लॅटफॉर्मवर करावा यासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने नुकतंच सांस्कृतिक मंत्र्यांकडे मागणी केली आहे.
लॉकडाऊनमुळे हिंदी प्रमाणे अनेक मराठी चित्रपटांना सुद्धा आर्धिक नुकसान सोसावे लागले आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म मराठी चित्रपटांचा निर्मिती खर्चदेखील वसूल होत नाही, अशी निर्मात्यांची तक्रार आहे. महाराष्ट्र शासनाच्या जीआरनुसार थिएटरमध्ये रिलीज झालेल्या चित्रपटांनाच अनुदान मिळू शकणार आहे.
या पार्श्वभूमीवर ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज कराव्या लागलेल्या चित्रपटांना आपण अनुदान योजनेत सामावून घ्यावे, जेणेवरून त्या चित्रपटाच्या निर्मात्यांचे नुकसान होणार नाही आणि त्यांना मोठा हातभार लागेल व ते आणखी चित्रपट निर्मिती करू शकतील, अशी मागणी करण्यात आली आहे.
आतापर्यंत ओटीटीवर महानायक अमिताभ बच्चन यांचा ‘गुलाबो सीताबो’, अभिनेत्री विद्या बालन हिचा ‘शकुंतला देवी’ आणि ‘दिल बेचारा’ असे अनेक चित्रपट प्रदर्शित करण्यात आले आहे.





