सर्वच माध्यमिक शाळांना मराठी भाषा अनिवार्य!

नगर – मराठी माध्यमांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना द्वितीय भाषा अथवा सामाजिक शास्त्र या विषयाऐवजी व्यवसाय विषय निवडण्याची मुभा देण्यात आली तर इंग्रजी व इतर माध्यमाच्या शाळांना सामाजिक शास्त्रे किंवा अन्य भाषा विषया ऐवजी व्यवसाय विषय निवडता येणार आहेत. मात्र, सर्वच माध्यमिक शाळांना मराठी भाषा अनिवार्य ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान अंतर्गत सन 2014 पासून माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातील विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय शिक्षण योजना राबवण्यात येत आहे. या सोबतच विद्यार्थ्यांना विषय निवडीचे विकल्प देण्यात येणार होते.
यामध्ये प्रामुख्याने इंग्रजी व्यतिरिक्त इतर माध्यमांच्या विद्यार्थ्यांना द्वितीय भाषेऐवजी व्यवसाय शिक्षण निवडण्याचे तर इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्याना भाषा 1 आणि भाषा 2 ऐवजी व्यवसाय विषय निवडण्याचे स्वातंत्र्य मिळाले होते.
सन 2016 मध्ये राज्य शासनाने एक परिपत्रक काढून – पासून सर्व माध्यमाच्या विद्यार्थ्यांना सामाजिक शास्त्र या विषया ऐवजी व्यवसाय विषय निवडीला परवानगी देण्यात आली होती. मात्र, माध्यमिक शाळांत परीक्षा – मध्ये हिंदी, गुजराती, उर्दू आदी माध्यमांच्या काही शाळांनी मराठी विषय वगळून व्यवसाय विषय निवडले होते. त्यामुळे राज्य शासनाच्या मराठी विषय अनिवार्य विषय असल्याच्या धोरणाला हरताळ फासल्या जात असल्याचे समोर आले होते.





