Box Office वर मराठीचीच हवा..! ‘दशावतार’ने रचला नवा इतिहास; केली इतक्या कोटींची भरगच्च कमाई

Marathi Cinema Box Office : 12 सप्टेंबर हा दिवस खूप खास होता. याचं कारण म्हणजे या दिवशी मराठीतील तीन सिनेमे प्रदर्शित झाले. दशावतार, आरपार आणि बिन लग्नाची गोष्ट अशी या तीन सिनेमांची नावं आहेत. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या दशावतारला मोठा प्रतिसाद प्रेक्षकांचा मिळत असून बॅाक्स अॅाफिसवर नव्या आकडेवारीनुसार तब्बल पाच कोटींची कमाई या सिनेमाने पहिल्याच विकेंटमध्ये करत नवा इतिहास रचला आहे.
याशिवाय इतर रिलीज झालेल्या दोन्ही सिनेमांना देखील चांगला प्रेक्षकवर्ग मिळाला असून या सिनेमांनीही बऱ्यापैकी कमाई केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, दशावतार सिनेमाने 5.7 कोटी रुपये कमाई केली आहे. पण असं असलं तरी या सिनेमाचं बजेट सात कोटींचे आहे, त्यामुळे आणखी काही दिवसांनंतर उर्वरित रक्कमही हा सिनेमा वसूल करेल असं सांगण्यात आलं आहे. यामुळे बॅाक्स अॅाफिसवर दशावतारचीच हवा थोडक्यात मराठी सिनेमाची हवा असल्याचं दिसून आलं आहे.
दुसरीकडे, अभिनेता ललित प्रभावळकर आणि अभिनेत्री हृता दुर्गुळे यांची फ्रेश जोडी असलेला आरआर सिनेमाने ६० लाख रुपयांची कमाई केली आहे. तर अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट यांच्या बिन लग्नाची गोष्ट या सिनेमाने ५३ लाख रुपयांची कमाई केली आहे. यामुळे या सिनेमांना प्रेक्षकांचा थंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
दशावतार हा सिनेमा २०२५ मधील सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरणार असल्याचं आकडेवारीवरून दिसतं आहे. यामुळे अजून काही दिवस या सिनेमाची बॅाक्स अॅाफिसवर अशीच यशस्वी घोडदौड राहिली तर हा सिनेमा या वर्षातल्या सर्व सिनेमाचं रेकॅार्ड मोडले. तसेच महाराष्ट्रात बॅालिवूड सिनेमांही दशावतार टफ फाइट देऊ शकतो असं बोललं जात आहे.
हेही वाचा : Paresh Rawal: ‘हेरा फेरी 3’मध्ये परतणार बाबूराव! परेश रावलची पुष्टी





