Marathi cinema – दारु पिऊन ‘झिम्मा 2’ मधला ‘तो’ सीन केला ? निर्मिती सावंत म्हणाल्या

Marathi cinema – ‘झिम्मा २’ चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा हा टीझर अनोखा असून पुन्हा एकदा हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. जिओ स्टुडिओज आणि आनंद एल. राय प्रस्तुत, चलचित्र मंडळी निर्मित आणि हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ चित्रपटात सात जणींच्या सात तऱ्हा पुन्हा एकदा टिझर मधून मजेदारपणे झळकत आहे.
View this post on Instagram
अशात सोशल मीडियावर झिम्मा 2 च्या ट्रेलरमधील निर्मिती सावंत यांचा एक सीन खूप व्हायरल होत आहे. ज्यात त्या दारु पितांना दिसत आहेत. त्यांचा हा सीन सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. इतकंच नाही तर त्याच्यावरुन काही भन्नाट मीम्सही तयार करण्यात आले. हा सीन नेमका कसा शूट करण्यात आला हे त्यांनी सांगितलं.
या सीन बाबत निर्मिती सावंत म्हणाल्या,’तुम्हाला सगळ्यांनाच मजा वाटेल या गोष्टीची. पण, मला दारु, सिगारेट, तंबाखू अगदी चहा सुद्धा यापैकी कसलंच व्यसन नाहीये. आणि, मला माहित नाही कसं पण ते दारुचे सीन माझ्याकडून खूप छान होतात. मला बरेच जण विचारतात. मग मला असं वाटतं की निरीक्षणामुळे असं असेल का? तर नाही. कारण, मी कधीच असं कोणाचं निरीक्षण केलेलं नाही. मी विचार केला की निर्मला गावची मोकळी ढाकळी बाई आहे. तिने जर अशी दारु प्यायली आणि तिला चढली तर ती कशी वागेल बिचापी. जे लोकांना आवडतंय ना मी जशी ट्रेलरमध्ये हसते ते आपोआप आलंय. मी फक्त स्वत:ला बजावतेय की तू निर्मला कोंढेपाटील आहे”, असं निर्मिती सावंत म्हणाल्या.
सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव आणि सिद्धार्थ चांदेकर या गेल्या भागातील कलाकारांसोबत आता रिंकू राजगुरू आणि शिवानी सुर्वे या दोघी देखील या तगड्या स्टारकास्टमध्ये दाखल झाल्या आहेत. आणि या टीझरमध्ये त्यांची पात्र देखील भन्नाट वाटत आहेत.
दरम्यान, २४ नोव्हेंबरला प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमा निर्मिती सावंत, रिंकू राजगुरु, शिवानी सुर्वे, सुचित्रा बांदेकर, सायली संजीव, क्षिती जोग, सुहास, सिद्धार्थ चांदेकर ही कलाकार मंडळी मुख्य भूमिकेत झळकले आहेत.





