Marathi Celebrities : गिरीजा ओक, अशोक सराफ यांच्यासह अनेक मराठी सेलिब्रेटींनी बजावला मतदानाचा हक्क !

Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात आज बुधवारी 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. राज्यातील 288 मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली असून संपूर्ण मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी निवडणूक आयोग आणि पोलीस यंत्रणा तयार आहे.
दिग्गज नेतेमंडळींसह अनेक सेलिब्रिटींनी देखील मतदानाचा हक्क बजावला आहे. अभिनेता अक्षय कुमार, अली फझल, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, फरहान अख्तर, झोया अख्तर आणि राजकुमार राव यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
अभिनेता सुबोध भावे यांनी मतदान हक्क बजावला आहे. सुबोध भावाने नेहमी प्रमाणे सकाळीच मतदान केले आहे. सुबोधने कसबा येथे गुजराती प्रायमरी शाळेत मतदान केले आहे. तर, दुसरीकडे अभिनेत्री गिरीजा ओक गोडबोले यांनी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील बाल शिक्षण मंदिर प्रशालेत मतदान केले.
अभिनेते अशोक सराफ आईनी देखील पत्नी, अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्या सोबत मतदान केले आहे. यासोबतच अभिनेता सक्षम कुलकर्णी याने सुद्धा मतदानाचा हक्क बजावला आहे.
राज्यातील 288 विधानसभा जागांवर मतदान होणार असून शनिवारी 23 नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत राज्यात सरासरी 32.18 टक्के मतदान झाले आहे. तर, सकाळी 9.30 वाजेपर्यंत 6.61 टक्के मतदान झालं आहे.





