जाणून घ्या आज (2 फेब्रुवारी) दिवसभरातील ठळक घडामोडी एका क्लिकवर!

पुणे: देश-विदेश, राजकीय, सामाजिक, आर्थिक, मनोरंजन, आणि क्रीडा जगतातील आज दिवसभरामध्ये घडलेल्या महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर! पहा दैनिक प्रभातचे आजचे स्मार्ट बुलेटिन…
1. हिंदु महासभेचे नेते रणजित यादव यांची हत्या
मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या यादव यांच्यावर अज्ञाताकडून गोळीबार
2. कोरोनाचा देशातील दुसरा बाधीतही केरळचाच
केरळमध्ये दुसरा बाधीत आढळल्याने सतर्कतेत वाढ
3. कोरोनाच्या दुसऱ्या बाधीतामुळे घाबरण्याचे कारण नाही
केरळच्या आरोग्य मंत्र्याचा दावा, सरकार आव्हान पेलण्यास सज्ज
4. दहशतवाद्यांचे समर्थन करणारे शाहीन बागच्या आंदोलनात सहभागी
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा आरोप
5. एनआयकडून जम्मू- काश्मिारात छापे
खासगी कार्यालये आणि निवासस्थाने एनआयएच्या रडारवर
6. एलआयसी कर्मचाऱ्यांचा 4 फेब्रुवारीला देशव्यापी संप
एलआयसीतील हिस्सा विक्रीला कर्मचाऱ्यांचा विरोध
7. वुहानमधून भारतीयांचे दुसरे विमान दिल्लीत दाखल
323 भारतीय आणि मालदिवच्या सात नागरिकांना घेऊन एअर इंडियाचे विमान मायदेशी
8. शेतकऱ्यांच्या मोर्चात गर्दी वाढवण्यासाठी हिरोईन आणू
भाजप नेते बबनराव लोणीकर यांची जीभ घसरली
9. सीएए राज्यात लागू होऊ देणार नाही
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भूमिका
10. देशाचे विभाजन करत असलेले राजकारण थांबवा
शाहिनबाग प्रकरणावर अभिनेत्री सोनम कपूरची प्रतिक्रिया





