Main Wapas Aaunga: मराठमोळी अभिनेत्री शर्वरी वाघचा ‘मैं वापस आऊंगा’ चित्रपट OTTवर येण्यास सज्ज
Main Wapas Aaunga : नसिरुद्दीन शाह यांचीही महत्त्वाची भूमिका

Main Wapas Aaunga : इम्तियाज अली दिग्दर्शित ‘मैं वापस आऊंगा’ या चित्रपट आता ओटीटीवर येण्यास सज्ज झाला आहे. यात मराठमोळी अभिनेत्री शर्वरी वाघ हिने मुख्य नायिकेची भूमिका साकारली आहे. तर तिच्याबरोबर लोकप्रिय अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांझ आणि वेदांग रैना महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकले.
प्रेमकथेवर आधारित या चित्रपटातील गाण्याला अनेकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. यानंतर आता हा चित्रपट तुम्हाला घर बसल्या पाहता येणार आहे. पंजाब येथील प्रेमकथेवर आधारित १२ जून रोजी थिएटरमध्ये रिलीज झालेला ‘मैं वापस आऊंगा’ हा चित्रपट येत्या ७ ऑगस्टपासून ओटीटीवर पाहता येणार आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटाची कथा १९४७ च्या फाळणीच्या वेदना आणि एका अपूर्ण प्रेमकथेभोवती फिरते. फाळणीच्या वेळी एकमेकांवर प्रेम करणारे कसे एकमेकांपासून दुरावतात आणि वर्षांनंतरही त्यांचे प्रेम कसे कमी होत नाही, हे यात दाखवण्यात आले आहे. (Main Wapas Aaunga)
नसिरुद्दीन शाह यांची भूमिका (Main Wapas Aaunga)
चित्रपटात नसिरुद्दीन शाह यांनी एका वृद्धाची भूमिका साकारली आहे, जे आयुष्याच्या शेवटच्या वळणावरही आपल्या जुन्या आठवणी आणि दिलेली वचनं विसरू शकलेले नाहीत. त्यांच्या नातवाच्या भूमिकेत दिलजीत दोसांज दिसून आला आहे, जो आपल्या आजोबांचे ते अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो.
दुसऱ्या बाजूला वेदांग रैना याने तरुणपणाची भूमिका साकारली असून शर्वरी वाघ त्याच्या गर्लफ्रेंडच्या भूमिकेत पाहायला मिळाली आहे. दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. तसेच ए.आर. रहमान यांच्या संगीताने या चित्रपटाला आणखीनच खास बनवले आहे. थिएटरनंतर हा चित्रपट ओटीटीवर (OTT) आपली जादू दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे.
हेही वाचा:






