Prajakta Mali: प्राजक्ता माळी देवदर्शनासाठी पोहोचली गुजरातला, पूर्ण करतेय ‘तो’ संकल्प

Prajakta Mali At Jyotirlinga Temple : अभिनेत्री प्राजक्ता माळीची प्रमुख भूमिका असलेला ‘फुलवंती’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. या चित्रपटातील तिच्या भूमिकेची देखील विशेष चर्चा झाली. या चित्रपटाची निर्माती देखील प्राजक्ताने केली होती. आता अभिनेत्री कामातून ब्रेक घेत देवदर्शन करत आहे. देवदर्शनाच्या निमित्ताने प्राजक्ता वर्षभरापूर्वी केलेला आपला संकल्प देखील पूर्ण करत आहे.
प्राजक्ता देवदर्शनासाठी गुजरातला पोहोचली आहे. गुजरातमध्ये तिने श्री सोमनाथ आणि श्री नागेश्वर या दोन ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतले. गुजरात भेटी दरम्यान तिने द्वारका बेटाला भेट देत द्वारकाधीशांचे देखील दर्शन घेतले.
View this post on Instagram
या देवदर्शनाचे फोटो देखील तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. देवदर्शनाद्वारे प्राजक्ता 2023 मध्ये घेतलेला आपला संकल्प पूर्ण करत आहे. अभिनेत्रीने वर्षभरात १२ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्याचे ठरवले होते. परळी वैजनाथ मंदिर आणि नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे भेट देत दर्शन घेतले होते. आपल्या कामातून वेळ काढत अभिनेत्री आता आपले वचन पूर्ण करताना दिसत आहे.
View this post on Instagram
दरम्यान, प्राजक्ताच्या कामाबद्दल सांगायचे तर जुळून येती रेशीमगाठी, महाराष्ट्राची हास्यजत्रा या मालिकेतून ती महाराष्ट्रातील घराघरांमध्ये पोहोचली आहे. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेला तिचा फुलवंती चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. निर्माती म्हणून तिचा हा पहिलाच चित्रपट होतो. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन स्नेहल प्रविण तरडे यांनी केले आहे. हा चित्रपट प्राइम व्हीडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.





