फरहान अख्तरसोबत झळकणार मराठमोळा अभिनेता; ‘120 बहादूर’ चित्रपटाचा टिझर रिलीज

Farhan Akhtar | बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरचा बहुप्रतिक्षित ‘120 बहादूर’ चित्रपटाचा टीझर अखेर प्रदर्शित झाला आहे. हा टीझर प्रेक्षकांच्या मनात देशभक्तीची नवी ऊर्जा देणारा आहे. टिझरच्या पहिल्याच झलकमध्ये हा चित्रपट धैर्य आणि बलिदानाशी निगडित एक भव्य युद्धकथा असल्याचे स्पष्ट करते.
या चित्रपटात फरहान अख्तर मेजर शैतान सिंह भाटी यांच्या भूमिकेत दिसत आहेत. तर फरहानसोबत मराठमोळा अभिनेता अजिंक्य देवही महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळाला. Farhan Akhtar |
‘120 बहादूर’ ही 1962 च्या रेझांग ला येथील खऱ्या शौर्याची कथा सांगते. यात 120 भारतीय सैनिकांनी हजारो शत्रूंसमोर ठामपणे उभे राहून इतिहास घडवला, हे दाखवले जाणार आहे. चाहत्यांनाही हा टीझर आवडला असून अनेकांनी फरहानच्या भूमिकेचे कौतुक केले आहे. Farhan Akhtar |
नेटकऱ्यांनी देखील कमेंट करत ‘फरहानचे दमदार पुनरागमन, काय टीझर आहे,’ ‘फरहान अख्तर धमाल करणार आहे’, ‘हा खरा चित्रपट आहे, काय जबरदस्त टीझर आहे,’ असे लिहिले आहे. Farhan Akhtar |
‘120 बहादूर’चे चित्रीकरण लडाख, राजस्थान आणि मुंबईत झाले आहे. हा चित्रपट युद्धभूमीला पुन्हा जिवंत करतो. राजनीश ‘रेजी’ घई यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला ‘120 बहादूर’ हा रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांनी निर्मित केला आहे. हा चित्रपट 21 नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होईल. फरहानच्या पुनरागमनासाठी चाहते खूप उत्साहित आहेत. फरहान शेवटचा 2021 मध्ये ‘तूफान’ चित्रपटात दिसला होता. मात्र हा चित्रपट अपयशी ठरला होता. Farhan Akhtar |
हेही वाचा :





