लेक माझी लाडकी! बायको ऑफिसला गेली… मग अभिनेत्यानेच बांधली मुलीची वेणी, पाहा सुंदर व्हीडिओ

Actor Abhijeet Kelkar | अभिनेता अभिजीत केळकरने त्याच्या अभिनयाद्वारे स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘तुझेच मी गीत गात आहे’, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकांमधील त्याच्या भूमिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. अभिजीत सोशल मीडियावर देखील विशेष सक्रीय असतो. तो काम व खासगी आयुष्यातील गोष्टींबाबत सोशल मीडियावर माहिती शेअर करत असतो. नुकताच, त्याने सोशल मीडियावर लेकीसोबतच एक सुंदर व्हीडिओ शेअर केला असून, हा व्हीडिओ व्हायरल होत आहे.
‘आई ऑफिसला जाते तेव्हा आम्ही…’, असे मजेशीर कॅप्शन देत त्याने हा शेअर केला आहे. या व्हीडिओमध्ये अभिजीत बायको कामाला गेल्यानंतर मुलीची कशाप्रकारे काळजी घेतो, हे दिसत आहे. या व्हीडिओ अभिनेता आवडीने लेकीच्या केसांच्या दोन वेण्या बांधताना दिसत आहे.
View this post on Instagram
अभिजीतचा हा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर आता इतर कलाकार व नेटकऱ्यांकडून त्याचे कौतुक केले जात आहे. ‘किती गोड मुलगी आणि किती गोड बाबा.’, आदर्श पती आणि आदर्श बाबा, अशा कमेंट्स करत नेटकऱ्यांनी अभिजीतचे कौतुक केले आहे.
दरम्यान, अभिजीतच्या कामाबद्दल सांगायचे तर त्याने ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’, ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकांमध्ये भूमिका साकारली आहे. तो ‘बिग बॉस मराठी’मध्येही तो सहभागी झाला होता. तसेच, सध्या ‘आजीबाई जोरात’ या नाटकात काम करत आहे.





