Maratha Reservation । जरांगेंच्या आंदोलनामुळं पुन्हा तणाव; जालनासह 3 जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद !

Maratha Reservation – मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जालनासह ३ जिल्ह्यातील इंटरनेट सेवा सोमवारी बंद ठेवण्यात आली आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर राज्यातील वातावरण तापले होते. दरम्यान, जालना, छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यांच्या सीमाही सील करण्यात आल्या आहेत.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील अफवांमुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तीन जिल्ह्यांतील इंटरनेट सेवा सकाळी 6 ते दुपारी 4 या वेळेत बंद करण्यात आली आहे, असे एका अधिकाऱ्याने गृह विभागाच्या आदेशाचा हवाला देत सांगितले.
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात सोमवारी मध्यरात्रीपासून जरंगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून संचारबंदी लागू करण्यात आली होती. । Maratha Reservation
परवानगीशिवाय आंदोलन केल्याबद्दल बीड जिल्ह्यात तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राज्य परिवहन बसचे नुकसान केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. । Maratha Reservation





