मराठा आंदोलकांना दुपारी ३ वाजेपर्यंतचा अल्टीमेटम; मुंबई पोलिस अॅक्शन मोडवर

Maratha Protest | Mumbai Police : मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासह इतर मागण्यांसाठी मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनसाठी हजारो आंदोलक मुंबई दाखल झाले आहेत. मात्र काही आंदोलनकर्त्यांनी धुडगूस घातल्याने मुंबईकरांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाल्याचे पाहायला मिळालं.
या आंदोलनाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावरील सुनावणीत आज सलग दुसऱ्या दिवशी देखील घेण्यात आली. यादरम्यान, मुंबई हायकोर्टाने ३ वाजेपर्यंत मुंबई रिकामी करा असा आदेश दिला आहे. दुपारी ३ पर्यंत आझाद मैदान रिकामे करण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टाने दिले असले तरी आझाद मैदान सोडणार नसल्याची ठाम भूमिका मराठा आंदोलकांनी घेतली आहे.
पोलिस आणि आंदोलकांमध्ये शाब्दिक वाद
आमच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत. आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही. आम्ही जेलमध्ये जायला तयार आहोत. मनोज जरांगे पाटील यांचे आदेश येईपर्यंत आम्ही कुठेही जाणार नाही, असेही आंदोलकांचे म्हणणे आहे. यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये शाब्दिक वाद सुरू असल्याचे देखील पाहायला मिळत आहे.
दुपारी तीन वाजेपर्यंत मुंबईतील परिस्थिती पूर्वरत करा, अन्यथा आम्हाला रस्त्यावर, आझाद मैदानात उतरून आढावा घ्यावा लागेल, असे निर्देश कोर्टाकडून देण्यात आलेत. मुंबईतील मराठा आंदोलनावर संतप्त टिप्पणी करत मुंबई उच्च न्यायालयाने मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदान खाली करण्याचे आदेश दिले आहेत. Maratha Protest | Mumbai Police
महाधिवक्तांनी सरकारची बाजू मांडली. तर माने शिंदे यांनी मराठा आंदोलकांची बाजू कोर्टात मांडली. कोर्टामध्ये दुपारी ३ वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे. पण मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेणार? याकडे राज्याचे लक्ष लागेल आहे. Maratha Protest | Mumbai Police
हेही वाचा:
Baaghi 4 song : ये मेरा हुस्न गाण्यावरील हरनाजच्या डान्सने चाहते घायाळ!





