maratha samaj । आज मराठा समजाच्या समन्वयकांची संभाजीनगरमध्ये येथे बैठक आयोजित करण्यात येणार होती. या बैठकी दरम्यान राडा झाल्याचे समोर आले आहे. मिळलेल्या माहितीनुसार, ठाकरे गटाच्या नेत्यांवर बैठकीतील समन्वयकांनी गंभीर आरोप लगावले आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांचे पैसे घेऊन काही लोक या बैठकीत आले होते, असा आरोप समन्वयकांनी केला. दरम्यान बैठक सुरु झाल्याच्या काही वेळानंतर दोन गटांत हाणामारी झाली आहे. या बैठकीत बाहेरचे लोक आल्याचे म्हटले जात आहे. दोन गटांत ही मारामरी झाल्यांतर ही बैठक आता तात्पुरती थांबवण्यात आली आहे. संभाजीनगरमध्ये मराठा समाजाची समन्वय बैठक होती. संभाजीनगर लोकसभेतून मराठा समाजाचा एक उमेदवार देण्यासाठी बैठक आयोजित केली होती. जळगाव रोड वरील मराठा मंदिर सभागृहात ही बैठक नियोजित होती. या बैठकीसाठी मराठा बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. केवळ पुरुषच नव्हे तर महिला आंदोलकही एकमेकींना भिडल्या. वृत्तवहिनीला दिलेल्या मुलाखतीत बैठकीत नेमकं काय घडले याबाबत दोन्ही गटांमधील कार्यकर्त्यांनी आपली बाजू मांडली आहे. महिला कार्यकर्ती म्हणाली, ‘या बैठकीत सामान्य मराठा लोकांचा आवाज दाबला जातोय. आम्ही मनोज जरांगे पाटलांबरोबर आहोत. इथे या लोकांची बैठक चालू होती. यांनी सर्वांना विश्वासात घेऊन बैठक घ्यायला हवी होती. बैठक घेण्यावरून इथे भांडण झालं.’ तर याच घटनेबाबत दुसऱ्या एका कार्यकर्त्याने सांगितलं की, ‘आम्ही केवळ मराठा समाजासाठी इथे आलो आहोत. आम्हीदेखील अनेक वर्षांपासून मराठा समाजासाठी लढत आहोत. परंतु, यांनी आम्हाला बैठकीसाठी बोलावलं नाही. आम्ही मराठा समाजाचे घटक नाही का? काहीजण राजकीय पक्षाकडून सुपारी घेऊन, पैसे घेऊन इथे आले होते. समाजातील कार्यकर्त्यांना कुठल्याही प्रकारचा मेसेज मिळाला नाही. हे काही ठराविक जण समाजाचे मालक झालेत का?’ असं म्हणत बैठकीबाबत सांगितलं आहे. हे वाचले का ? ठाकरे-शिंदे ‘या’ मतदारसंघांमध्ये थेट ‘आमनेसामने’