New Tax Regime: 74 टक्के करदात्यांनी स्वीकारली नवी कर पद्धती

नवी दिल्ली – आर्थिक वर्ष 2024-25 साठी आतापर्यंत आठ कोटी करदात्यांनी विवरण सादर केले आहे. त्यातील 74 टक्के करदात्यांनी नवी पद्धत स्वीकारून त्यानुसार विवरण सादर केले असल्याचे सांगण्यात आले.
दोन वर्षांपूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी करदत्यांना दोन पर्याय दिले होते. त्यानुसार जुनी कर रचना आणि नवीन कर रचना उपलब्ध करण्यात आली होती. जुन्या कर पद्धतीत जुन्या कर सवलती कायम ठेवण्यात आल्या होत्या. तर नवीन कर पद्धत सवलतीशिवाय सुटसुटीत करण्यात आली होती.
दरम्यानच्या काळामध्ये बर्याच करदात्यांनी आता नवीकर पद्धती स्वीकारण्यास सुरुवात केली असल्याचे दिसून येते. या वर्षात 75 लाख करदात्यांनी सुधारित विवरण सादर केले यातून 8 हजार कोटी रुपये अतिरिक्त उपलब्ध झाले. विवरण दाखल केलेल्या आठ कोटी करदात्यापैकी 5.92 कोटी करदात्यांनी नवी कर पद्धत स्वीकारली आहे.
हळूहळू बहुतांश करदाते नवी पद्धत स्वीकारतील अशी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाला अपेक्षा आहे. नवीकर पद्धत सुटसुटीत करण्यात आली आहे. या अंतर्गत विवरण भरताना करदात्यांना फारसा त्रास होत नाही असे अर्थ मंत्रालयाचे म्हणणे आहे.

