Chitrangada Singh : अभिनेत्री चित्रांगदा सिंहने बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारलेल्या आहेत. सध्या चित्रांगदा तिच्या “रात अकेली है: द बन्सल मर्डर” या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला असून, चांगला प्रतिसाद प्रेक्षकांकडून चित्रपटाला मिळत आहे. चित्रपटातील चित्रांगदाने साकारलेल्या भूमिकेचे कौतुक केले जात आहे. याशिवाय चित्रांगदा सलमान खानसोबतच्या तिच्या आगामी ‘बॅटल ऑफ गलवान’ चित्रपटामुळेही चर्चेत आहे. या चित्रपटाचा टीझर सलमान खानच्या वाढदिवसाच्या दिवशी प्रदर्शित झाला आहे. चित्रांगदाने एका मुलाखतीत इंडस्ट्रीमधील तिचे अनुभव शेअर केले आहेत. झूमशी झालेल्या मुलाखतीत चित्रांगदाने खुलासा केला आहे की, इंडस्ट्रीमध्ये राजकारण आणि सत्तेचा खेळ अस्तित्वात आहे. इंडस्ट्रीमधील प्रभावशाली लोक नेहमीच अडथळे निर्माण करतात. या उद्योगात मिळवण्यासारखे तसेच गमावण्यासारखे देखील खूप काही आहे, असेही मत चित्रांगदाने व्यक्त केले. जेव्हा तुम्ही अशा ठिकाणी असता जिथे प्रसिद्धी आणि बरेच काही साध्य करण्याची संधी असते, तेव्हा अनेक लोक तुमच्या मार्गात अडथळे निर्माण करतात. अशा लोकांशी तुम्हाला लढावे लागते, त्यामुळे सामना करायला शिकले पाहिजे असा सल्ला अभिनेत्रीने दिला. इंडस्ट्रीमधील तिच्या प्रवासाबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली की, माझ्या बाबतीत नशीब आणि संघर्ष दोन्ही होते. तुम्हाला दोघांवर अवलंबून राहावे लागते. यशस्वी होण्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागेल. चित्रांगदाच्या कामाच्याबाबतीत बोलायचे झाल्यास २०२५ मध्ये तिने “परिक्रमा,” “हाऊसफुल 5,” “खाकी: द बंगाल चॅप्टर,” आणि “रात अकेली है.” या चित्रपटात काम केले आहे. २०२६ या नवीन वर्षातही चित्रांगदा अनेक चित्रपटांमध्ये झळकणार असून, त्या चित्रपटांबाबत माहिती समोर आलेली नाही. हेही वाचा : “नेहरूंची ‘ती’ कागदपत्रे गांधी कुटुंबांनी परत करावी” ; गजेंद्र सिंह शेखावतांची मागणी