Manushi Chhillar : ‘बडे मियाँ छोटे मियाँ’मध्ये मानुषी छिल्लर दिसणार अक्षयसोबत ?

मुंबई – मिस वर्ल्ड अभिनेत्री मानुषी छिल्लरने अक्षय कुमारच्या ‘सम्राट पृथ्वीराज’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. नुकताच मानुषीचा ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ हा दुसरा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात मानुषीसोबत विकी कौशल दिसणार आहे.
लवकरच मानुषी’तेहरान’मध्ये दिसणार आहे. त्याचवेळी, आता ती ‘बडे मियाँ छोटे मियाँ’मध्येही दिसणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. मानुषीने अलीकडेच या चित्रपटाच्या चर्चांवर आपली भूमिका स्पष्ट केली. Manushi Chhillar , Akshay Kumar , Tiger Shroff, Movie Bade Miyan Chote Miyan ,
रिपोर्ट्सनुसार, मानुषी छिल्लर या चित्रपटात हॅकरच्या भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चांवर आता तिनेच उत्तर देत पूर्ण विराम लावला आहे. ती चित्रपटात हॅकरची भूमिका करत आहे का? पत्रकाराला उत्तर देत मानुषी म्हणाली, ‘मी हॅकरची भूमिका करत नाहीये. कदाचित मी या चित्रपटात अजिबात नाही. काही काळापूर्वी एका सूत्राने याचा खुलासा केला होता आणि सांगितले होते की, ‘मानुषी ‘बडे मियाँ छोटे मियाँ’मध्ये हॅकरच्या भूमिकेत दिसणार आहे आणि तिची भूमिका चित्रपटात काही मनोरंजक ट्विस्ट आणणार आहे.’
‘बडे मियाँ छोटे मियाँ’मध्ये अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. मानुषीचा अक्षयसोबतचा हा दुसरा चित्रपट असेल. हा चित्रपट अली अब्बास जफर दिग्दर्शित करत आहे. हा चित्रपट पुढील वर्षी 2024 मध्ये ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट युरोप आणि UAE मध्ये शूट करण्यात आला आहे. Manushi Chhillar , Akshay Kumar , Tiger Shroff, Movie Bade Miyan Chote Miyan ,
मानुषी छिल्लरच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर ती जॉन अब्राहमसोबत ‘तेहरान’मध्ये दिसणार आहे. चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. चित्रपटाचे पोस्ट-प्रॉडक्शनचे काम सध्या बाकी आहे. यासोबतच मानुषी वरुण तेजसोबत ‘ऑपरेशन व्हॅलेंटाइन’मधून साऊथ चित्रपटांमध्ये पदार्पण करणार आहे. हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. मानुषी या चित्रपटात रडार ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. Manushi Chhillar , Akshay Kumar , Tiger Shroff, Movie Bade Miyan Chote Miyan ,





