कात्रज/धनकवडी : मांँसाहेब जिजाऊ हे आम्हा शिवसैनिकांचं स्फूर्तीस्थान असून राजमाता जिजाऊंनी दाखवलेला मार्ग आजच्या पिढीने आत्मसात करण्याची गरज आहे. त्यांनी घडवलेला शिवरायांचा विचार महत्वाचा असल्याचे मत विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी मांडले. पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ३७ (धनकवडी-कात्रज डेअरी) येथे शिवसेनेच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त महिलांच्या पुढाकारातून ‘राजमाता जिजाऊ वंदन कार्यक्रम’ आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम धनकवडीतील गुलाबनगर चौक येथील शिवसेना निवडणूक कचेरीत मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी गोऱ्हे बोलत होत्या. यावेळी प्रभाग क्रमांक ३७मधील शिवसेनेच्या सागर विठ्ठल बारणे, सुलक्ष्मी हिरामण धनकवडे, मोहिनी राजेंद्र देवकर, गिरीराज तानाजीराव सावंत या चारही उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक, कार्यकर्ते, तसेच प्रभागातील नागरिक आणि माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांमध्ये विशेष उत्साह दिसू आला. उपस्थितांनी जिजाऊंच्या विचारांवर चालणाऱ्यांनाच जनतेचे आशीर्वाद मिळतील, असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमामुळे प्रभाग क्रमांक ३७ मध्ये शिवसेनेच्या प्रचाराला अधिक बळ मिळाले आहे. विरोधकांच्या निष्क्रियतेवर आणि दुटप्पी भूमिकेवर नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विरोधकांना राजमाता जिजाऊंचा विसर “राजमाता जिजाऊंचे नाव केवळ राजकीय सोयीसाठी वापरण्याची प्रवृत्ती विरोधी पक्षांमध्ये दिसून येते, ही अत्यंत खेदजनक बाब आहे. राज्यभर राजमाता जिजाऊ जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असताना प्रभाग क्रमांक ३७मध्ये मात्र विरोधी पक्षांना जिजाऊंचा पूर्णतः विसर पडलेला दिसत आहे.” – गिरीराज सावंत, शिवसेना उमेदवार, प्रभाग ३७-ड