ई-कॉमर्ससाठी मनुष्यबळ विकसनाची मोहीम

वाहतुकीचे नियम, सॉफ्ट स्कील अवगत करणार

पुणे – इंटरनेट आणि मोबाइलमुळे ई-कॉमर्स क्षेत्र मोठ्या शहराबरोबरच छोट्या शहरात वाढत आहे. हे काम करणाऱ्या लोकांना पुरेसे कौशल्य नसल्यामुळे अनेकदा अडचणी निर्माण होतात. हे टाळण्यासाठी राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाच्या वाहतूक विभागाने (एलएससी) या क्षेत्रातील कौशल्य वाढविण्याची मोहीम हाती घेतली आहे. यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असे महामंडळाला वाटते.

“एलएससी’चे पदाधिकारी रामानुजन म्हणाले, भविष्यात वाढणाऱ्या उद्योगांसाठी कुशल मनुष्यबळ निर्माण करण्याची मोहीम सरकारने हाती घेतली आहे. त्याचबरोबर या क्षेत्रात अनौपचारिक पद्धतीने काम केले जाते. कर्मचारी कुशल असल्यानंतर हे क्षेत्र औपचारिक होण्यास मदत होईल व त्याचबरोबर रोजगार निर्मिती होईल.

“एलएससी’ याकरिता प्लीप कार्टसारख्या ई- कॉमर्स कंपन्यांच्या शाखांशी सहकार्य करून कौशल्य विकासाचा कार्यक्रम तयार करीत आहे. ई-कॉमर्स संबंधातील तंत्रज्ञान या कर्मचाऱ्यांना अवगत करण्याबरोबरच ग्राहकांशी नम्रपणे (सॉफ्ट स्कील) कसा व्यवहार करावा, एखादी अडचण निर्माण झाल्यास ती कशी सोडवावी याबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे. सध्या यासाठी 8 तासांचा प्रशिक्षण कार्यक्रम तयार करण्यात आलेला आहे. स्थानिक पातळीवरील कर्मचारी या प्रशिक्षणाचा उपयोग करून स्वतःचे कौशल्य वाढू शकतात. त्यामुळे आहे, त्या कर्मचाऱ्यांना आपले काम चांगले करता येईल. त्याचबरोबर हे प्रशिक्षण घेतल्यानंतर संबंधित कंपन्यात काम उपलब्ध होऊ शकणार आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.