मनोज जरांगेंच्या भाषणाला सुरुवात; लाखोंची गर्दी, जमलेल्या लोकांचे मानले आभार

Manoj jarange Dussehra 2024 | मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचा पहिल्यांदाच दसरा मेळावा होत आहे. यासाठी बीडमधील नारायण गडावर मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित राहिले आहेत. मनोज जरांगे यांच्या भाषणाला आता सुरवात झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना भाषणाच्या सुरुवातीलाच मुजरा करत जरांगे यांनी भाषणाला सुरुवात केली आहे. तसेच जमलेल्या लोकांचे आभार मानले.
नजर जाईल एवढे लोकं येतील असं खरंच वाटलं नव्हते, असे जरांगे यांनी म्हंटले आहे. तसेच त्यांनी मीडियाला चारही बाजूला कॅमेरे फिरवा आणि हा जनसमुदाय राज्याला दिसू द्या. कानाकोपऱ्यातील बांधव दिसू द्या. नुसती गर्दी पाहूनच समोरच्यांचा कार्यक्रम होईल,’ असं जरांगे म्हणाले.
पुढे ते म्हणाले, “मराठा समुदायावर संस्कार आहेत. हा समुदाय कधीही कोणावर जातीभेद करत नाही.. या समाजाने प्रत्येकाला साथ देण्याचं काम केलं. या समाजाने कधीच जातीवाद केला नाही. हा समाज मस्तीत आणि मग्रुरीत कधीच वागत नाही. प्रत्येकाला सांभाळण्याचं, साथ देण्याचं काम केलं आहे. यांनी कधी जातीवाद केला नाही या समाजाला जात कधी शिवली नाही. पण हे न्यायासाठी आंदोलन सुरू आहे. ”





