जरांगे पाटलांची जीभ घसरली ! प्रसाद लाड यांच्यावर केली अर्वाच्च भाषेत टीका

जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यावर हल्लाबोल केला आहे. प्रसाद लाड यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना जरांगें पाटलांची जीभ घसरली. प्रसाद लाड माझ्या नादी लागू नको अशा शब्दात जरांगेंनी लाड यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
जरांगे पाटील नेमके काय म्हणाले?
मी जातीसाठी लढतो. तुम्ही काहीही करा, माझ्या नादी लागू नका. 288 पाडायचे की उभे करायचे मी ठरवणार. मराठ्यांचं रक्त असेल तर फडणवीसांना जाब विचारा. 20 जुलै रोजी उपोषणाला बसणार असं देखील जरांगे पाटील म्हणाले.
प्रसाद लाड यांच्यावर टीका
मराठा आरक्षणावरून जरांगे पाटील फडणवीस यांच्यावर टीका करत आहेत. जरांगेंना देवेंद्र द्वेष नावाचा आजार झाला अशी टीका प्रसाद लाड यांनी केली होती त्यांच्या या टीकेला आता जरांगे पाटलांनी प्रत्युत्तर दिले आहे. तू देवेंद्र फडणवीस यांचे पॅन्ट शर्ट काढून बघ, त्याला कुठला रोग झाला आहे ते.? असे जरांगे पाटील म्हणाले. तुला देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल एवढं प्रेम आहे तर तू फडणवीस यांच्या सोबत लग्न कर. तसेच तुला पैशाची मस्ती आली असेल पण समाजापुढे पैसा मोठा नाही. असं देखील जरांगे पाटील म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांना दिला इशारा
माझं बरं-वाईट झाल्यास सरकार टिकणार नाही. 20 तारखेला ठरवणार समाजाची बैठक कधी घ्यायची. देवेंद्र फडणवीस लोक अंगावर घालू नका. मराठा खवळला तर सोडणार नाही. तुम्हाला सांगण्याची ही चौथी वेळ आहे. आता मराठे हाणामारी करणार नाही तूमच्याकडे निघतील तुमची गय करणार नाही. असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला.





