‘तुमचं राजकीय करिअर उद्ध्वस्त नाही केलं तर नाव बदलेन’; जरांगेचा भुजबळांना गंभीर इशारा

छत्रपती संभाजीनगर : सध्या राज्यात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणचा मुद्दा चांगलाच तापला आहे. एकीकडे मनोज जरांगे यांनी सरकारला अल्टिमेटम दिला आहे तर दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे मागच्या ७ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. यादरम्यान आज लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगेवर निशाणा साधला. त्याला मनोज जरांगे यांनीदेखील जशाच तसे उत्तर दिले. यादरम्यान जरांगे यांनी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांना गंभीर इशारा दिला.
काय म्हणाले मनोज जरांगे?
ओबीसी आंदोलक आमचे विरोधकच नाहीत. तो येवलावाला काड्या करत आहे. लक्ष्मण हाकेंना भुजबळांनीच उभे केले आहे. ओबीसी आंदोलनाला भुजबळच सगळे पुरवत आहेत. तुमचे राजकीय करिअर उद्ध्वस्त नाही केले तर नाव बदलेन, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांना दिला आहे.





