“स्वतःची चूक झाकण्यासाठी आम्हाला डीवचू नका” ; मनोज जरांगेंची नामदेव शास्त्रींवर टीका

Manoj Jarange on Namdeo Shastri । सरपंच संतोष देशमुख प्रकरणात भगवानगडचे महंत नामदेव शास्त्री यांनी एन्ट्री घेतल्यानंतर आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. धनंजय मुंडे खंडणीवर जगणारे नेते नसल्याचे विधान नामदेवशास्त्री यांनी केले होते. दरम्यान, त्यांच्या या विधानानंतर धनंजय देशमुख महंत नामदेव शास्त्रींची भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत आहेत. दरम्यान, मराठा आरक्षण स्थगित केल्यानंतर मनोज जरांगे यांनी नामदेवशास्त्रींवर हल्लाबोल केलाय.
मनोज जरंगे यांनी,”स्वतःची चूक झाकण्यासाठी डीवचू नका ,तुमच्याकडून चूक झाली आहे .एका समाजाला बाजूला नेण्याचं काम झालं आहे, असे म्हणत त्यांनी नामदेवशात्री यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच ‘ज्यांच्याकडे मानाचा तुरा आहे तिथेही जातीयवाद होऊ शकतो. जातिवादाचा नवा अंक ते देऊन गेले आहेत” अशीही टीका त्यांनी यावेळी केली.
तिथेही जातीयवाद होऊ शकतो Manoj Jarange on Namdeo Shastri ।
महंत नामदेव शास्त्रींच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आज धनंजय देशमुख कुटुंबीयांसह भगवानगडावर जाणार आहे. यावर मनोज जरांगे म्हणाले, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. कुटुंबांनं जावं. महाराजांना जे बोलायचं होतं ते बोलून गेले. जातीयवादाचा नवीन अंक देऊन गेले. नामदेव शास्त्री आरोपींचे समर्थन करत आहे. संतोष देशमुख यांची हत्या केली म्हणून आरोपींना आनंद वाटला असेल. ज्यांच्याकडे मानाचा तुरा आहे तिथेही जातीयवाद होऊ शकतो. याचा नवीन अंक पाहायला मिळत आहे असं मनोज जरंगे म्हणाले.
आम्ही तुमचा सन्मान करतो पण आपण आपलं बघावं दुसऱ्याकडे डोकावून पाहू नका. स्वतःची चूक झाकण्यासाठी डीवचू नका. तुमच्याकडून चूक झाली आहे. एका समाजाला एका बाजूला नेण्याचं काम झालं आहे .जातीय सलोखा बिघडवायला नको होता .पण धनंजय मुंडेंच्या टोळीमुळे चौथा अंक पाहायला मिळाला .आरोपींच्या बाजूने मोर्चे निघाले .जातीयवादाचा अंक भयंकर आहे .असं मनोज जरांगे म्हणाले .
संतोष देशमुख जाणार भगवानगडावर Manoj Jarange on Namdeo Shastri ।
संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आता दोन महिने होत आले आहेत .या प्रकरणात संत महंतांनी उडी घेतल्याने राजकीय वातावरण तापू लागलं आहे. बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांचा अध्यक्षतेखाली नियोजन समितीची बैठक झाल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे भगवानगडावर मुक्कामी गेले होते. त्यानंतर भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे निर्दोष असल्याचं सांगितलं. यानंतर धनंजय देशमुख यांच्यासह त्यांचे संपूर्ण कुटुंब भगवानगडावर आज जाणार आहे





