“लक्ष्मण हाकेंचे ओबीसी आंदोलन सरकार पुरस्कृत, हे सरकार घडवून आणतयं” ; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप

Manoj Jarange on Laxman Hake। राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा समोर आला आहे. दोन्ही आरक्षणासाठी आंदोलक आंदोलन करताना दिसून येत आहेत. त्यातच ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनावर मनोज जरांगेंनी टीका केलीय. एवढंच नाही तर ओबीसी आंदोलन सरकार पुरस्कृत असल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी केला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे यांनी “आरक्षण घेतल्याशिवाय आंदोलन सोडणार नसल्याचे म्हटले. त्यासोबतच एकाही तरूणाने आरक्षणासाठी आत्महत्या करू नये,” अशी विनंती देखील मनोज जरांगेंनी केली आहे.
माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे यांनी, “भारतात लोकशाही आहे त्यामुळे त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. त्यांची मागणी ते करतात मी माझ्या समाजावर ठाम आहे. ते दिशाभूल करत आहेत. दिशाभूल करायची ती त्यांना करू द्या. आरक्षण संविधानाने दिले आहे. SC ST ला धक्का लागणार नाही त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. त्याचं आंदोलन सरकार पुरस्कृत आंदोलन आहे. आधीचे आणि आताचे आंदोलन पाहिल्यावर लक्षात येत आहे. आंदोलनाला एवढे लोक येतात त्यावरुनच लक्षात येते. आंदोलकांना मी काही म्हणत नाही मात्र हे सरकार घडवून आणत आहे.” असा गंभीर आरोप देखील यावेळी जरंगे यांनी केला.
माझा त्यांच्या आंदोलनाला विरोध नाही Manoj Jarange on Laxman Hake।
लक्ष्मण हाकेच्या आंदोलनावर मनोज जरांगे म्हणाले, “माझा त्यांच्या आंदोलनाला विरोध नाही. मी त्यांच्यावर उत्तर देणार नाही. मी किती वेळेला पाडा म्हणालो ते सांगा. आम्ही जेवढे दिवस म्हणतो विरोध नाही तर तुम्ही आता जास्त करत आहात.”असेही त्यांनी म्हटले.
मराठ्यांच्या पोरांनी जीव देऊ नका Manoj Jarange on Laxman Hake।
मराठा तरुणाच्या आत्महत्येवर मनोज जरांगे यांनी, “राज्यातील तरुणांना हात जोडून विनंती की कधी न मिळणारे आरक्षण आपल्याला मिळत आहे. नंबर लागला नाही आत्महत्या करू नका. पुन्हा प्रयत्न करा, काही दिवसांनी तुम्हाला आरक्षण मिळणार. मी आरक्षण मिळवून देणार आहे. नोकरी हुकली तरी चालेल मात्र तुमचा जीव महत्वाचा आहे. तुमचा जीव आमच्यासाठी महत्वाचा आहे. काळजी करू नका. तुम्हाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय मी हटत नाही. पुढील दिवसात तुम्हाला आरक्षण असेल. मराठ्यांच्या पोरांनी जीव देऊ नका.” असे आवाहन त्यांनी यावेळी केले.





