“हे टिकली लावणारे संत फक्त सुपाऱ्या, नारळ…” कालिचरण महाराज यांच्या टीकेला मनोज जरांगेंचे उत्तर

Manoj Jarange on Kalicharan Maharaj। छत्रपती संभाजी नगर येथे आयोजित केलेल्या एका धार्मिक सभेत मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांच्यावर स्वयंघोषित महाराज कालीचरण यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. मनोज जरांगे यांचे नाव न घेता त्यांनी मराठा आरक्षणाचा नेता असा उल्लेख करत ते हिंदुत्व संपवणारा राक्षस असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्याच्या या वक्तव्यावर सर्व स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत होता. त्यानंतर आता मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी कालिचररण महाराज यांना सडेतोड उत्तर दिले आहे.
“मी साधू-संताचा आदर करतो” Manoj Jarange on Kalicharan Maharaj।
मनोज जरांगे पाटील यांनी कालीचरण यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली एका वृत्तवाहिनीशी बोलताना जरांगे यांनी, “मी साधू-संताचा आदर करतो. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदुत्व मानतो. माझ्याबद्दल जे बरळत आहेत, त्यांना बरळू द्यावे. कारण ज्याने एका पक्षाचा ठेका घेतला आहे, अशांबद्दल आपण काही बोलले नाही पाहिजे. संत-महात्म्यांचा आदर करणे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवले आहे. आम्ही ज्या हिंदू धर्मात आहोत, त्यातील सर्वात कट्टार वर्ग आहे मराठा समाज. पण हाच समाज आज अडचणीत आलेला आहे.” असे विधान त्यांनी केले.
हे टिकली लावणारे संत फक्त सुपाऱ्या, नारळ, पैसे घेऊ शकतात Manoj Jarange on Kalicharan Maharaj।
तसेच जरांगे यांनी कालिचरण यांच्यावर सडकून टीका करताना,“आम्ही आरक्षण मागतो, याचा अर्थ आम्ही जातीवाद करत नाहीत. आम्ही हिंदूच आहोत. पण गरीबांच्या मुलांना आरक्षण दिले जात नाही. वाकडी टिकली लावलेले स्वतःला धर्माचे रक्षक मानतात. पण धर्माची खरी रक्षक जनता आहे. जनता स्वतःच्या अंगावर वार सोसते. हे टिकली लावणारे संत फक्त सुपाऱ्या, नारळ, पैसे घेऊ शकतात. खरा हिंदू धर्म वारकरी, गरीब जनता चालवत आहे. हरळ खाऊन जगणारे लोक धर्माचे ठेकेदार नाहीत. मराठा कट्टार हिंदू आहे आणि राहणारच”, असेही म्हणाले.





