मनोज जरांगेंची छगन भुजबळांच्या येवल्यात होणार एन्ट्री ? ; उपोषणाचा ठराव ग्रामसभेत मंजूर

Manoj Jarange hunger strike । मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषण केले होते मात्र त्यांना गावकऱ्यांनी आणि समर्थकांनी उपोषण मागे घेण्याचा आग्रह धरला होता. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी नुकतेच आपले उपोषण मागे घेतले. उपोषण मागे घेतले असले तरी आता मनोज जरांगे यांनी पुढील उपोषण येवल्यात करावे, अशी मागणी पुरणगाव व एरंडगाव खुर्द ग्रामस्थांनी केलीय. त्यामुळे आता मनोज जरांगे यांची येवल्यात एंट्री होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सर्व परवानग्या व सेवेची जबाबदारी पुरवणार, ग्रामसभेत ठराव Manoj Jarange hunger strike ।
मनोज जरांगे पाटील यांनी येवल्यातही उपोषण करील, असे म्हटल्यानंतर नाशिकच्या येवला तालुक्यातील पुरणगाव ग्रामस्थांनी मनोज जरांगे पाटील यांचे पुढील उपोषण पुरणगावात घ्या, असा ग्रामसभेत ठराव केला आहे. या उपोषणासाठी लागणाऱ्या परवानग्या व सेवा पुरवण्याची जबाबदारी पुरणगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी स्वीकारण्याची तयारी दाखवली आहे. यासाठी ग्रामपंचायत पुरणगाव व एरंडगाव खुर्द ग्रामपंचायत यांनी ग्रामसभा घेऊन तसा ठराव केला आहे. आता मनोज जरांगे येवल्यात उपोषणाला बसणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मनोज जरांगे पाटलांचा सरकारला नवा अल्टीमेटम Manoj Jarange hunger strike ।
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडताना सरकारला नवा अल्टीमेटम दिलाय. त्यांनी म्हटलंय की, गावकऱ्यांनी उपोषण सोडत सलाईन लावण्याची विनंती केली. आम्हाला आरक्षण पाहिजे आणि तुम्ही पण पाहिजे, असे समाजाचे म्हणणे होते. समाजाच्या मायेपोटी उपचार घेतले. सरकार उपोषणच्या शक्तीला घाबरते. पण, आता सलाईन लागली आहे. त्यामुळे उपोषणाचा उपयोग नाही. सरकारला 13 ऑगस्टपर्यंत वेळ देत आहे. सरकारनं मागण्या मान्य कराव्यात. सरकारचा ज्या खुर्चीत जीव आहे. ती खुर्ची ओढण्यासाठी मी आता तयारी करणार आहे. सलाईन लावून बेगडी उपोषण करणार नाही, असे त्यांनी म्हटले.
दरम्यान, काही दिवसांपासून मनोज जरांगे हे आता पुढील उपोषण येवल्यात करतील, अशी चर्चा सुरु आहे. मनोज जरांगे यांनी देखील, “छगन भुजबळ हे येवल्यामध्ये बसले आहेत. आता येवल्यामध्ये येऊन उपोषणाला बसतो असे विधान केले होते. त्यामुळे आता मनोज जरांगे यांची भुजबळांच्या येवल्यात एंट्री होणार का हे पाहणे गरजेचे आहे.
हेही वाचा
शरद पवार – अजित पवार एकत्र निवडणूक लढवणार? ; जयंत पाटलांचे मोठे वक्तव्य, म्हणाले,”…





