मनोज जरांगेंची प्रकृती खालावली
Updated On:

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांची तब्येत अचानक खालावली आहे. डॉक्टरांकडून जरांगे यांची तपासणी सुरू असून त्यांना पुन्हा एकदा सलाईन लावण्यात आली आहे. तसेच जरांगे यांच्या हृदयाची तापासणीही करण्यात येणार आहे.
गेल्या काही दिवासांपासून मनोज जरांगे यांची दगदग वाढली असल्याने त्यांची तब्येत खालावली असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. मनोज जरांगे यांची सध्या ईसीजी आणि टूडी इको चाचणी करण्यात येणार आहे.





