Manoj Jarange : उद्या अहमदनगर जिल्हा बंदची हाक ! मनोज जरागेंच्या समर्थनार्थ मराठा रस्त्यावर उतरणार

Manoj Jarange – मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधत मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे यांनी १७ सप्टेंबरपासून अंतरवाली सराटी येथे पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे. मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाला बरेच दिवस झाले असून, त्यांची प्रकृती देखील दिवसेंदिवस खालावली जात आहे. आज त्यांच्या उपोषणाचा ६ वा दिवस आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारला शेवटची संधी असल्याचे म्हणत मनोज जरांगे यांनी पुन्हा थेट इशारा देत शेवटचे अल्टिमेटम दिले. मनोज जरांगे यांच्या तीन प्रमुख मागण्या आहेत. मराठा आणि कुणबी एकच असल्याचा अध्यादेश काढा, मराठ्यांच्या कुणबी नोंदींवरून सगेसोयऱ्यांनाही आरक्षण द्या आणि हैद्रराबादसह सातारा संस्थान आणि बॉम्बे गॅझेट लागू करा. या प्रमुख मागणीसाठी त्यांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे.
मराठा समाजाने जालना जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. त्यानंतर, परभणी आणि पुणे जिल्ह्यातही मराठा समाजाने बंदची हाक दिली आहे. आता, सकल मराठा समाजाकडून अहमदनगर जिल्हा बंदची देखील हाक देण्यात आली आहे. सकल मराठा समाजाच्यावतीने उद्या अहमदनगर जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला सुरुवात केलीय. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून उद्या अहमदनगर जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ अहमदनगर तहसील कार्यालयासमोर गेल्या दोन दिवसापासून आमरण उपोषण देखील सुरू आहे.
माझा गेम करू नका ! जरांगेंची प्रकृती आणखी बिघडली, म्हणाले…
Manoj Jarange : माझा गेम करू नका ! चौथ्या दिवशी जरांगेंची प्रकृती आणखी बिघडली, म्हणाले…





