Manoj Jarange health Update | मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला अखेर मोठे यश मिळाले आहे. मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण झाल्याने मनोज जरांगे पाटील यांनी पाचव्या दिवशी आझाद मैदानवरील उपोषण सोडलं. त्यानंतर मराठा बांधवांकडून एकच जल्लोष करण्यात आला. मात्र पाच दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. सोमवारपासून जरांगे पाटील यांनी पाणी पिणेही सोडलं होतं, त्यामुळे त्यांची प्रकृती नाजूक झाली होती. उपोषण सोडल्यानंतर मनोज जरांगे आझाद मैदानावरून थेट संभाजीनगरला रुग्णालयात उपाचरासाठी दाखल झाले. छत्रपती संभाजी नगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात रात्री साडेबारा वाजता जरांगे पोहोचले. सध्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वैद्यकीय देखरेखेखाली ठेवण्यात येणार जरांगे पाटील यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी सांगितले की, “पाच दिवसांपासून उपोषण तसेच सततच्या प्रवासामुळे आठवडाभर जरांगे पाटील यांचे उपोषण झालं आहे. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांना चक्कर येत होती, पोटही दुखत होते. त्यांचा बीपी 96 आहे तर शुगर मुंबईत तपासली तेव्हा ७० होती. एकंदरीत त्यांची तब्येत थोडीशी नाजूक आहे.” सध्या जरांगे यांच्यावर उपचार सुरु केले असून इतर तपासणीही केली जात आहे. उपोषणामुळे त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला असून पुढील काही दिवस वैद्यकीय देखरेखेखाली ठेवण्यात येणार आहे,” असं डॉक्टर म्हणाले. याशिवाय मनोज जरांगे यांच्यावर पुढील दोन आठवडे उपचार करण्यात येणार आहेत. त्यांना पुढील १५ दिवसात कोणत्याही दौऱ्यासाठी बाहेर पडता येणार नाही, असंही डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. Manoj Jarange health Update | दरम्यान, राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भातच्या मागण्या मान्य केल्यानंतर मनोज जरांगे यांनी आझाद मैदानावरील उपोषण सोडले. पाचव्या दिवशी त्यांनी सरकारचा नवा प्रस्ताव मान्य करत उपोषण सोडत असल्याचे जाहीर केले. Manoj Jarange health Update | मनोज जरांगेंच्या कोणत्या मागण्या मान्य? हैदराबाद गॅझेट अंमलबजावणीसाठी शासन निर्णय – मान्य आंदोलनातील मृतांच्या वारसांना आर्थिक मदत – मान्य आंदोलनातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी – मान्य मराठा आंदोलकांवरील केसेस मागे – मान्य प्रलंबित जात पडताळणीला मान्यता – मान्य आंदोलकांवरील गुन्हे घेण्यास मान्यता – मान्य मनोज जरांगेंच्या कोणत्या मागण्या प्रलंबित? सातारा गॅझेट अंमलबजावणीसाठी – 1 महिन्याची मुदत मराठा-कुणबी एकच शासन निर्णय – 2 महिन्यांची मुदत हेही वाचा: Pune District : रांजणगाव व कारेगाव परिसरात कंपन्या सुटण्याच्या वेळेस वाहतूक कोंडी