“मनोज जरांगेंना देवेंद्र द्वेष नावाचा आजार झाला”; प्रसाद लाड यांची टीका

Prasad Lad On Manoj Jarange | मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरून सध्या राजकीय वातावरण तापले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी अनेकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. यातच आता मनोज जरांगे यांच्या टिकेला भाजप नेते प्रसाद लाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
भाजप नेते प्रसाद लाड यांनी व्हिडिओ शेअर करत मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे. प्रसाद लाड म्हणाले, “मनोज जरांगे हे देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेऊन द्वेष करत आहेत. जरांगे पाटील यांना डीडी नावाचा रोग झाला आहे. त्यांना देवेंद्र द्वेष झालाय.६० वर्षांत जे होऊ शकलं नाही ते देवेंद्रजींनी केलं. मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबवले, जरांगे पाटील कोणाच्या छत्रछायेखालून हा द्वेष करत आहेत?, हा संशोधनाचा विषय आहे.”
मनोज जरांगे यांना देवेंद्र द्वेष नावाचा आजार झालाय!
🔸६० वर्षांत जे होऊ शकलं नाही ते देवेंद्रजींनी केलं!
🔸मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबवले!
🔸जरांगे पाटील कोणाच्या छत्रछायेखालून हा द्वेष करत आहेत?, हा संशोधनाचा विषय आहे.
🔸जरांगे पाटील साहेब, तुम्हाला माहिती… pic.twitter.com/yKbY9cyjg2— Prasad Lad (@PrasadLadInd) July 18, 2024
” जरांगे पाटील साहेब, तुम्हाला माहिती देणारे चुकीची माहिती देतात, आम्ही तुमचं आवाहन स्वीकारायला तयार आहोत!, परंतु तुम्ही चर्चेला तयार आहात का? आम्हाला तुमचा अभिमान आहे, परंतु एका विशिष्ठ व्यक्तीला टार्गेट करणे चुकीचे आहे. मनोज जरांगे पाटील हे देवेंद्र फडणवीस यांचा द्वेष करताय, ते योग्य नाही,” असे प्रसाद लाड यांनी म्हंटले. Prasad Lad On Manoj Jarange |
“प्रवीण दरेकर हे विधानपरिषदेचे आमदार आहेत. ते भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. तुम्ही चर्चेला तयार आहात का? तुम्ही चर्चेला याच. २०१७ पासून अनेक योजना काढल्या. मी देखील त्याच समाजातून येतो. पण विशिष्ट व्यक्तीला टार्गेट करण्याचा प्रयत्न होत आहे. तुम्हाला राजकारण करायचं असेल तर तुम्ही राजकारणात यावं. राजकारणाचं उत्तर हे राजकारणाने द्यावं. समाजासाठी लढायचं असेल तर चर्चेतून मार्ग काढावा,” असेही आवाहन प्रसाद लाड यांनी केले. Prasad Lad On Manoj Jarange |
हेही वाचा:
‘100 घेऊन या आणि सरकार बनवा’; भाजपमधील अंतर्गत वादानंतर अखिलेश यादव यांची मान्सून ऑफर





