Manoj Ghorpade: ‘पंचक्रोशी’ ने संस्कारक्षम पिढ्या घडविल्या – आ. मनोज घोरपडे

प्रभात वृत्तसेवा
रहिमतपूर – ग्रामीण भागात एखादी संस्था काढणे, नियमांचे पालन करीत ती प्रभावीपणे चालवणे, नावारुपाला आणणे ही गोष्ट इतकी सोपी नसते. ‘पंचक्रोशी’ ही जिल्ह्यातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था असून संस्थाध्यक्षा सौ. चित्रलेखा माने- कदम यांनी दूरदृष्टीने बदलत्या काळाचा वेध घेत आपल्या शैक्षणिक संस्थेत काळानुरूप बदल केले. दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य दिले. यामुळे या संस्थेचे नाव सर्वदूर पोहोचले आहे.
‘पंचक्रोशीच्या माध्यमातून अनेक संस्कारक्षम पिढ्या घडल्या आहेत, असे गौरवोद्गार आ. मनोज घोरपडे यांनी काढले.रहिमतपूर येथील ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, आर्ट्स, कॉमर्स अँन्ड व्होकेशनल कॉलेजच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजप महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा उपाध्यक्षा, पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा सौ. चित्रलेखा माने-कदम होत्या.
व्यासपीठावर भाजपचे युवानेते, नूतन नगरसेवक नीलेश माने, माऊली एज्यु केअरच्या डायरेक्टर सौ. प्रियंका कदम, कोंडीराम माने, प्रकाशबापू माने, सतीश भोसले, सोसायटीचे संचालक अशोक माने, नगरसेवक रणजित माने, मयुरेश माने, तुषार माने, सूरज गायकवाड, डॉ. राजेंद्र भोसले, प्राचार्य पी. पी. वावरे, संस्थेचे माजी विद्यार्थी एम. पी. एस. सी. च्या माध्यमातून नुकतीच लेफ्टनंटपदी निवड झालेले तेजस कोरे, इंजिनिअर साक्षी कदम उपस्थित होते.
सौ. चित्रलेखा माने-कदम म्हणाल्या, करिअरची अनेक क्षितिजे असतात ती विद्यार्थ्यांना ओळखता आली पाहिजेत. अलीकडे खाजगी किंवा शासकीय नोक-या मिळणे कठीण झाले आहे. सुशिक्षित युवकांनी मातीशी एकनिष्ठ राहून नवे तंत्रज्ञान आत्मसात करीत उत्तम शेती केली तर ते अभिमानास्पद करिअर बनू शकते. सर्वच युवकांनी यादृष्टीने विचार करणे ही काळाच गरज बनली आहे.
तेजस काटे, साक्षी कदम या माजी विद्यार्थ्यांनी संस्था व कॉलेजविषयी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.प्राचार्य पी.पी. वावरे यांनीप्रास्ताविक केले. उपशिक्षक विश्वजीत जाधव व उपशिक्षक प्रतिभा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. उपप्राचार्य सुनील माने यांनी आभार मानले.
कार्यक्रमासाठी नगरसेवक नाना राऊत, सूरज गायकवाड, सोसायटीचे चेअरमन विक्रमसिंह माने, प्रल्हाद शेरकर, शेखर माने-पाटील, विजयराव माने, जगदीश गायकवाड, राजुभाऊ शिंदे, नानासो माने, किरण भोसले , विकास तुपे, बाळासाहेब माने-पाटील, अक्षय चव्हाण, सुहास माने, दिलीप शेवाळे, विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक, सर्व शाखांचे शाखाप्रमुख, शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.





