शिवसेनेचा ‘कोहिनूर’ हरपला ; संजय राऊत, नितीन गडकरी, मिलिंद नार्वेकर,अंबादास दानवे काय म्हणाले ? वाचा

Manohar Joshi Passed Away। शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन झाले. आज पहाटे हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 86 वर्षांचे होते. 21 फेब्रुवारी रोजी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने हिंदुजा हॉस्पिलमध्ये ॲडमिट केले होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे निदान झाल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.
अंत्यदर्शनासाठी त्यांना माटुंगा इथे त्यांच्या निवासस्थानी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळात ठेण्यात येणार आहे. दुपारी 2 नंतर अंत्ययात्रा सुरू होईल. दरम्यान, त्यांच्या निधनावर राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा
उद्धव ठाकरे बुलढाण्याचा दौरा अर्धवट सोडून मुंबईत परतले ; सर्व नियोजित दौरे रद्द
शून्यातून विश्व निर्माण करणारे..Manohar Joshi Passed Away।
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मनोहर जोशी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे . त्यासाठी त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “शून्यातून विश्व निर्माण करणारे.. कडवट महाराष्ट्र अभिमानी अखेरच्या श्वासा पर्यन्त शिवसैनिक म्हणुन जगलेले मनोहर जोशी यांना विनम्र अभिवादन!” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
शून्यातून विश्व निर्माण करणारे..
कडवट महाराष्ट्र अभिमानी
अखेरच्या श्वासा पर्यन्त शिवसैनिक म्हणुन जगलेले
मनोहर जोशी यांना विनम्र अभिवादन! pic.twitter.com/QV48ikmWv1— Sanjay Raut (@rautsanjay61) February 23, 2024
सरांच्या निधनाने राज्याच्या राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा हरवला Manohar Joshi Passed Away।
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी,”महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ नेते मनोहर जोशी सरांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दुःख झाले. सरांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा हरवला. अतिशय नम्र, हजरजबाबी आणि महाराष्ट्र तसेच मराठी माणूस यांच्याविषयी मनापासून तळमळ असलेला नेता आपण गमावला आहे. युती सरकारच्या काळात जोशी सरांच्या नेतृत्वाखाली मला काम करण्याची संधी मिळाली. कुटुंब प्रमुखाप्रमाणेच कायम त्यांचे मार्गदर्शन लाभले. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना या दु:खातून सावरण्याची शक्ती देवो. ॐ शांती.” असे म्हणत मनोहर जोशींना श्रद्धांजली वाहिली.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ नेते मनोहर जोशी सरांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दुःख झाले. सरांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा हरवला. अतिशय नम्र, हजरजबाबी आणि महाराष्ट्र तसेच मराठी माणूस यांच्याविषयी मनापासून तळमळ असलेला…
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) February 23, 2024
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, लोकसभेचे माजी अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सहकारी मनोहर जोशी सर यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. जोशी कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
भावपूर्ण… pic.twitter.com/TtiXG2AmE9— Milind Narvekar (@NarvekarMilind_) February 23, 2024
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, लोकसभेचे माजी अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सहकारी मनोहर जोशी सर यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. जोशी कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली, असे ट्वीट मिलिंद नार्वेकर यांनी केले आहे.
दुःखद! महाराष्ट्राचा ‘कोहिनूर’ आज पहाटे हरपला. माजी मुख्यमंत्री, माजी लोकसभा सभापती मनोहर जोशी सरांचे पहाटे निधन झाले. शिवसेनेने महाराष्ट्राला दिलेले ते पहिले मुख्यमंत्री.
शिवसेनेच्या पहिल्या फळीचे नेते म्हणून पक्ष उभा करण्यात त्यांनी दिलेले योगदान मोठे व अनमोल आहे. विशेष म्हणजे… pic.twitter.com/Hy74d2tLx2— Ambadas Danve (@iambadasdanve) February 23, 2024
ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनीही जोशी सरांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली.





