Manmohan Singh Funeral । काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आज माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या स्मारकाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी, “डॉ.मनमोहन सिंग यांचा जगभरात आदर आहे. जेव्हा तो बोलत होते तेव्हा जगाने ऐकले. त्यांचे स्मारक उभारण्यासाठी केंद्र सरकार राजकारण करत आहे.” असा आरोप त्यांनी यावेळी केला. मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्कारासाठी राजघाटावरील जागा देण्याबाबत केंद्र सरकारच्या स्पष्टीकरणावर अशोक गेहलोत यांनी टीका केली. त्यांनी यावेळी, ” सरकारला ही जमीन द्यायचीच होती, मग आधी का जाहीर केली नाही? देशभरातून आवाज उठू लागल्यानंतर सरकारने ही घोषणा का केली? असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला. स्मारकाच्या जागेचा वाद का? Manmohan Singh Funeral । अशोक गेहलोत यांच्या म्हणण्यानुसार, “डॉ. मनमोहन सिंग यांच्यासारख्या महान व्यक्तिमत्त्वाच्या अंत्यसंस्कार आणि स्मारकाच्या बांधकामाबाबत एनडीए सरकारने विनाकारण वाद निर्माण केला आहे. ज्या व्यक्तिमत्त्वाबद्दल जग आदर करत आहे, त्यांच्या अंत्यसंस्काराचे आयोजन भारत सरकारने एखाद्या विशेष ठिकाणी करण्या ऐवजी निगम बोध घाटावर केले आहे.” असेही त्यांनी यावेळी म्हटले. शेखावत आणि बाळ ठाकरे यांची आठवण Manmohan Singh Funeral । पुढे अशोक गेहलोत यांनी, “2010 मध्ये भाजपची कोणतीही मागणी न करता माजी उपराष्ट्रपती भैरोसिंग शेखावत यांच्या निधनानंतर आमच्या सरकारने त्यांच्या कुटुंबीयांशी बोलून त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी जयपूरमध्ये तात्काळ विशेष जागा दिली आणि त्यांचे स्मारक बांधले. त्याठिकाणी 2012 मध्ये महाराष्ट्रात बाळ ठाकरे यांच्या निधनानंतर काँग्रेस सरकारने मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये खास जागा दिली होती आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. केंद्र सरकार दबावापुढे झुकले काँग्रेसने नेहमीच सर्व पक्षांच्या नेत्यांना सन्मानपूर्वक निरोप दिला. पण भाजपने डॉ. मनमोहन सिंग यांच्याशी केलेले असे वागणे दुर्दैवी आहे. त्यांच्या निधनाने आज संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. सरकारच्या या पावलावर देशातील जनतेने तीव्र नाराजी व्यक्त केली असताना, जनभावनेच्या दबावाखाली भाजप सरकार भविष्यात स्मारक उभारण्याच्या घोषणा करत आहे.